आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Before Withdrawing The PIN From The Bank, The Credit Card Will Be Withdrawn By Rs 3 Lakh

बँकेतून पिन येण्यापूर्वीच क्रेडिट कार्डातून काढले ३.३० लाख रूपये

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - बजाजनगर येथे सायबर फसवणुकीचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. जर्मनीतील सायबर ठकसेनांनी जय अंबेनगरातील कमलकांत त्यागी यांच्या नव्या क्रेडिट कार्डद्वारे ४५०० यूएस डॉलर म्हणजे सुमारे ३.३० लाख रुपये काढले. विशेष म्हणजे क्रेडिट कार्डाच्या पिन क्रमांकाचा पोस्टाने आलेला लिफाफा फसवणुकीच्या दुसऱ्या दिवशी खातेदाराच्या हातात पडला.  रुपये काढताना आवश्यक असलेला ओटीपी किंवा संदेश अथवा कॉल त्यागींना आलेला नाही. 

असे आहे प्रकरण... 
त्यागी यांनी बजाजनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले, त्यांना ६ ऑगस्ट रोजी इंडसइंड बँकेचे नवे क्रेडिट कार्ड मिळाले आहे. त्याची मर्यादा ३.५३ लाख इतकी होती. ९ ऑगस्ट रोजी क्रेडिट कार्डद्वारे ४५०० यूएस डॉलर म्हणजे ३,३०, ३४७ रुपये टाइटनूस लि. जर्मनीच्या खात्यात वळते झाले होते. हा व्यवहार दुपारी २.३० वाजता झाला. १५ मिनिटांनी बँकेतून त्यांना तुमच्या क्रेडिट कार्डाद्वारे जर्मनीतील एका फर्मद्वारे रक्कम वळती झाल्याचा फोन आला. तेव्हा मी कार्ड लगेच ब्लॉक केले आणि फोन तपासला असता, मेसेजमध्ये पैसे वळते झाल्याचा उल्लेख होता. बँक कर्मचाऱ्यांना आपल्याकडे या कार्डाचा पिन क्रमांक नसल्याचे सांगितले. मग रुपये कसे काढले याची विचारणा केली होती. 
 

तज्ज्ञांच्या मते...विना पिन पैसे काढता येतात
परदेशी वेबसाइट कंपन्या क्रेडिट कार्डाशिवाय सीव्हीव्हीने पैसे उचलतात. विना पिन क्रमांक असा व्यवहार होऊ शकतो. यात ओटीपी व पिन क्रमांकही येत नाही. या केसमध्ये असेच झाले असावे. ही फसवणूक क्रेडिट कार्डातूनच होते. कारण यात थेट पैसे वळते होतात. क्रेडिट कार्ड जेथे तयार होते, तेथूनच पिन जनरेट होत असते. सुरक्षेसाठी पिन क्रमांक एकाच वेळी पाठवत नाहीत. 
आयुष भारद्वाज, सायबर एक्सपर्ट