आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्वासित भिकारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील उच्चभ्रू वसाहत असलेल्या विश्वभारती कॉलनी भागातील बसथांब्यावर गेले अनेक महिने, कदाचित दोन-तीन वर्षांपासून एक वेडा भिकारी रात्री आश्रयाला येतो. तेथेच झोपतो. कधी-कधी तर रात्री तो बाजूच्या उकिरड्यावरील फेकलेले अन्नही खाताना दिसतो. दिवसा मात्र तो नसतो. मला नेहमी प्रश्न पडतो, कोण असेल तो? नेहमी येतो, झोपतो. कोण आणि कुठे असतील याचे आप्तस्वकीय दिवसभर? काय करत असतो हा भिकारी? कुणालाही त्याची दया येते. शेजारच्या बंगल्यातील लोकांना कदाचित या भिकार्‍याबद्दल माहितीही असेल. पण सहानुभूतीपोटी त्याला कुणी हटकत नसेल. कदाचित खायलाही देत असतील. महासत्तेचे स्वप्न पाहणार्‍या भारतीयांचे या गोष्टीबद्दल असणारे अक्षम्य दुर्लक्ष मनाला वेदना देते. असा प्रकार प्रत्येक गावात असतो. अशा लोकांची काही कायमस्वरूपी व्यवस्था होणार नाही का? याबद्दल राजकीय पक्ष, प्रशासन, स्वयंसेवी संस्था यांनी विचार करावा असे वाटते.