आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Driving Licence And Vehicle Registration Format To Be Changed From 1 October 2019

1 ऑक्टोबरपासून ड्रायव्हिंग लायसन्स आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटमध्ये होणार मोठा बदल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूटिलिटी डेस्क  - विविध राज्यांतील ड्रायव्हिंग लायसेन्सचे फॉर्मेट वेगळे असल्यामुळे अडचण होत होती. यापासून सुटका होण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात एकसारखेच ड्रायव्हिंग लायसेन्स बनवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने यापूर्वी एक अधिसूचना जारी केली आहे. यानुसार 1 ऑक्टोबर 2019 पासून देशभरात तयार होणारे ड्रायव्हिंग लायसेन्स आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्रांचा फॉर्मेट एक सारखाच असणार आहे. 

एकसारखाच राहणार फॉर्मेट
केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने जारी केलेल्या सुचनेनुसार, 1 ऑक्टोबरपासून संपूर्ण देशात एकसारखेच ड्रायव्हिंग लायसेन्स तयार करण्यात येतील. सोबतच देशातील प्रत्येक राज्यातील ड्रायव्हिंग लायसेन्स आणि नोंदणी प्रमाणपत्रचा (आरसी) फॉर्मेट एकसारखा असणार आहे.  या सर्वांचा रंग देखील एकसारखाच असेल तसेच यामध्ये परवानाधारक किंवा वाहन मालकाशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळेल. 
 

यामुळे कोणताही गोंधळ होणार नाही
परिवहन मंत्रालयाने जारी केलेल्या सुचनेत सांगितले की, आतापर्यंत राज्य आपल्या सुविधेनुसार वेगवेगळ्या फॉर्मेटमध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स आणि आरसी जारी करत आहेत. यामुळे इतर राज्यांमध्ये त्याच्या वैधतेबद्दल संभ्रम निर्माण होतो. परंतू संपूर्ण देशात एकसारखे ड्रायव्हिंग लायसेन्स आणि आरसी असल्यामुळे अशा प्रकारचा गोंधळ उडणार नाही. 

ड्रायव्हिंग लायसेन्स पीव्हीसी किंवा पॉली कार्बोनेटचे असेल
अधिसूचनेनुसार सर्व राज्यांना 1 ऑक्टोबरपासून पीव्हीसी किंवा पॉली कार्बोनेटवर ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी करावे लागतील. यामध्ये एक चिप असेल ज्यामध्ये केंद्र सरकारच्या स्वरूपानुसार सर्व माहिती नोंदविली जाईल. 

बातम्या आणखी आहेत...