Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Beginning of inclusion process of Lingayat caste in OBC category

21 लिंगायत जातींची ओबीसी प्रवर्गात समावेश प्रक्रिया सुरू, शिवा संघटनेचे प्रमुख धोंडे यांची माहिती

प्रतिनिधी | Update - Aug 23, 2018, 12:10 AM IST

वीरशैव - लिंगायत समाजातील २१ जातींना आेबीसी यादीत समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ केला आहे.

 • Beginning of inclusion process of Lingayat caste in OBC category

  सोलापूर - वाणी जातीच्या हजारो मुलांना ओबीसी आरक्षणाचा लाभ या वर्षापासून घेता येईल, शिवा संघटना करीत असलेल्या पाठपुराव्यामुळे केंद्र शासन वीरशैव - लिंगायत समाजातील २१ जातींना आेबीसी यादीत समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ केला आहे, अशी माहिती शिवा संघटनेचे संस्थापक प्रमुख प्रा. मनोहर धोंडे यांनी दिली.


  प्रा. धोंडे म्हणाले, २५ ऑक्टोबर २०१६ मध्ये शिवा संघटनेसोबत केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत ही मागणी मान्य होत केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय झाला.


  केंद्र शासनाच्या समाजकल्याण विभागाचे सहसचिव बी. एल. मीना, केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या संशोधन अधिकारी शिल्पा तनेजा, डी. के. पांडे यांनी केंद्रीय मागासवर्ग आयोग बरखास्तीची तांत्रिक अडचण सांगितली होती. नंतर मागासवर्ग आयोग स्थापन होताच आरक्षण प्रक्रियेला त्वरित सुरवात होईल, असे सांगितले होते. यानंतर हा आयोग गठीत करण्याचे बिल लोकसभेत मंजूर झाले. मात्र राज्यसभेत नामंजूर झाल्याने आयोग दोन वर्षे स्थापला गेला नव्हता.

  वीरशैव-लिंगायत समाजातील २१ जातींचा केंद्र शासनाच्या ओबीसी लिस्टमध्ये समावेश करण्याच्या प्रक्रियेला प्रा. मनोहर धोंडे यांच्या प्रयत्नातून सुरुवात झाली आहे. वीरशैव-लिंगायत समाजातील २१ जातींना आरक्षणाचा लाभ मिळेल.


  पाच जणांचा अायोग : ६ ऑगस्ट २०१८ मध्ये राज्यसभेत हे बिल मंजूर करीत १२३ वी घटनादुरुस्ती झाल्यामुळे हा मार्ग मोकळा झाला. या केंद्रीय मागासवर्ग आयोगामध्ये एक चेअरमन, एक व्हाईस चेअरमन तर तीन सदस्य अशा एकूण पाच जणांचा अायोग असेल.


  वाणी जातीच्या विद्यार्थ्यांना लाभ : शिवा संघटनेच्या या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाच्या मानव संसाधन विभागाने जेईई एक्झामच्या ऑनलाइन फार्ममध्ये दुरुस्ती केल्याने या परीक्षेत वाणी जातीच्या हजारो विद्यार्थ्यांना ओबीसी आरक्षणाचा फायदा मिळणार आहे.

Trending