आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी सुंदर महाल होते हे भारतातील सर्वात स्वस्त आणि मोठे इलेक्ट्रॉनिक मार्केट, 4000 दुकानांमधून अब्जावधींची वार्षिक उलाढाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिलेर बेगम समरू यांचा महाल सध्या भारतातील सगळ्यात मोठा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा मार्केट म्हणून ओळखला जातो. जुन्या दिल्लीतील चांदनी चौक स्थित इलेक्ट्रॉनिक मार्केट म्हणजेच भागीरथ महालाविषयी आपल्यासाठी रंजक माहिती घेऊन आलो आहे.

 

कधीकाळी आलिशान दिसणारा हा महाल आज इलेक्ट्रॉनिक मार्केट म्हणून ओळखला जातो. या मार्केटमध्ये 4000 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक दुकाने आहेत. जिथे अब्जावधी रुपयांची उलाढाल होते. भागीरथ मार्केटचे मुख्याधिकारी भारत आहुजा यांनी सांगितले की, "भागीरथ महाल इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या होलसेल आणि रिटेल खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. 200 वर्षांपूर्वी हे मार्केट बेगम समरू यांचा महाल होता, या महालाची झलक आजही या ठिकाणी पाहायला मिळते, त्याचबरोबर महालाच्या भिंती, छत अजूनही सुस्थितीत बघता येतात. 

 

स्वस्त दरात करा इलेक्ट्रॉनिक वस्तुंची खरेदी
या मार्केटमध्ये चिनी लाइटस ते साउंड बॉक्स, स्विच, झूमर, मोबाइल फोन, अॅक्सेसरीज, फॅन अशा सगळ्याच प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी अल्पशा दरात करता येते.

 

पुढे वाचा- या चार सिनेमा हॉल्सच्या गेटमधून होते या मार्केटमध्ये एंट्री

 

बातम्या आणखी आहेत...