आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सायकल चोरास ३ वर्षांचा तुरुंगवास: आरोपीला यापूर्वी ४४ वेळा अटक, १२ वर्षांची भाेगली शिक्षा

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • सायकल चोरीस गेल्याने फिर्यादीस चालवावी लागली कार, त्यामुळे पर्यावरणाची हानी : न्यायाधीश
  • बेल्जियममध्ये इकॉलॉजिकल क्राइमखाली पर्यावरणाचा हवाला देत सुनावली शिक्षा

ब्रसेल्स - यूराेपीय देश बेल्जियमची लोकसंख्या १.१४ कोटी आहे. पर्यावरणाचे प्रदूषण थांबवण्यासाठी तसेच फिटनेससाठी येथील ९० टक्के लोक सायकल वापरतात.  अशाच एका घटनेत बेल्जियमच्या न्यायालयाने एका सायकल चोरास तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सायकल चोरीस गेल्याने पीडित व्यक्तीला कार चालवावी लागली.  त्यामुळे धूर बाहेर पडला आणि पर्यावरणात प्रदूषण निर्माण झाले, असा तर्क न्यायालयाने मांडला.
न्यायालयाने हा गुन्हा ‘इकॉलॉजिकल क्राइम’ असल्याचे म्हटले. ब्रसेल्समध्ये एका ४० वर्षांच्या चोरट्याने ऑक्टोबर २०१८ मध्ये सायकल चोरली होती.  फिर्यादीने सायकल चोरीची तक्रारही केली. काही दिवसानंतर पोलिसांनी चोरास अटक केली. प्रकरण न्यायालयात गेले.  सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी म्हटले, अारोपीने प्रदूषण वाढविण्यास मदत केली. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यामुळे त्याला ३ वर्षे तुरुंगवासात काढावे लागतील. तसेच आरोपीच्या वकिलासही त्यांनी शिक्षा सुनावली. आरोपीला यापूर्वी ४४ वेळा अटक, १२ वर्षांची भाेगली शिक्षा

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सायकल चोरास १९९५ ते २०१९ दरम्यान ४४ वेळा अटक झालेली होती. या प्रकरणात त्याने १२ वर्षे तुरुंगवासही भोगला आहे. तरीही त्याने सायकल चोरीचा उद्योग थांबवला नाही. एक्सेटर विद्यापीठाचे प्रा. कॅटरियोना मॅककिनोन यांनी म्हटले, चोराला शिक्षा देणे योग्य वाटते. परंतु पर्यावरणाचा हवाला देणे हे नियमाविरुद्ध आहे.