Home | International | Other Country | Beluga whale finds drowning iPhone, gives it back to phone owner; video goes viral Watch

व्हेलने महिलेचा समुद्रात पडलेला आयफोन शोधून दिला, व्हिडिओ झाला व्हायरल

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 10, 2019, 05:43 PM IST

रशियाचा गुप्तहेर मासा असल्याचा होता संशय

 • ओस्लो- नॉर्वेच्या हॅमरफेस्ट हार्बरमध्ये एका व्हेलने महिलेचा समुद्रात पडलेला फोन परत आणुन दिला आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे ज्या व्हेलला काही दिवसांपूर्वी रशियाची गुप्तहेर व्हेल सांगण्यात आले होते, त्याच व्हेलने हा फोन शोधून दिला आहे.


  स्थानीक मीडियाने सांगितल्यानुसार, इना मनसिका दोन आपल्या मित्रांसोबत काही दिवसांपूर्वी समुद्रात बोटिंग करत होती. अचानक तिचा फोन खिशातून समुद्रात पडला. ती तिच्या मित्रांना फोन पडल्याचे सांगण्यार इतक्यात एका व्हेलने तिला समुद्रातून तिचा फोन आणुन दिला. पाण्यात पडल्याने तिचा फोन खराब झाला, पण त्या व्हेलचे चातुर्य पाहून इनाने व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.


  रशियाचा गुप्तहेर मासा असल्याचा होता संशय
  नॉर्वेमध्ये 26 एप्रिलला बल्यूगा प्रजातीच्या याच व्हेलवर अधिकाऱ्यांनी हार्नेस लावलेला पाहिला होता. त्यानंतर व्हेलला रशियाकडून ट्रेन्ड करून गुप्तहेरी करण्यास पाठवले आहे असा आरोप लावण्यात आला होता. पण आता फोन दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून लोकांनी त्या निरागस प्राण्याचे कौतुक केले आहे.


  बल्यूगा व्हेलला आईसलंड पाठवले जाऊ शकते
  नॉर्वे सरकार सध्या बल्यूगाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. देशाचे डायरेक्टर ऑफ फिशरीज जॉर्गेन री वीगने अमेरीकेचे वृत्तपत्र वॉशिंगटन पोस्टला सांगितले की, समुद्रात तिला धोका असल्याने, बल्यूगाला आईसलंडच्या अभयारण्यात पाठवले जाईल.

Trending