आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूझीलंडचा मोठेपणा; विश्वचषक हिरावून घेणाऱ्या इंग्लडच्या बेन स्टोक्सला 'न्यूझीलंड ऑफ द ईअर' पुरस्कारासाठी नामांकन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ख्राईस्टचर्च- न्यूझीलंड संघाची खिलाडूवृत्ती किती मोठी आहे हे परत एकदा सिद्ध झाले आहे. क्रिकेट विश्वचषकात इंग्लंडच्या ज्या खेळाडूने न्यूझीलंडचा विजय हिसकावला, त्याच बेन स्टोक्सला न्यूझीलंडने "न्यूझीलंडर ऑफ द ईअर" पुरस्कारासाठी नामांकित केले आहे. त्याच्यासोबतच न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनलाही नामांकन मिळाले आहे. या पुरस्कारासाठी स्टोक्स, विल्यमनसशिवाय अन्य पाच जणही शर्यतीत आहेत.


खरतर बेन स्टोक्सला न्यूझीलंडच्या सर्वोच्च पुरस्काराचं नामांकन देण्यामागचे कारणही आश्चर्यकारक आहे. बेन स्टोक्सचे आई-वडील हे न्यूझीलंडचे असून, स्टोक्सचा जन्मही न्यूझीलंडमध्येच झाला आहे. आई-वडील आजही न्यूझीलंडमधल्या ख्राईस्टचर्चमध्ये राहतात. बेन त्याच्या वयाच्या बाराव्या वर्षी वडीलांसोबत इंग्लंडमध्ये दाखल गेला होता. पुढे एक क्रिकेटर म्हणून तो घडला आणि खेळलाही इंग्लंडसाठीच. बेन स्टोक्सने 14 जुलैला लॉर्डच्या मैदानात विश्वचषकाच्या फायनलमध्ये इंग्लंडला विश्वचषक जिंकून देऊन नवा इतिहास घडवला. स्टोक्सच्या नाबाद 84 धावांच्या खेळीने इंग्लंडला विश्वचषकाची फायनल पहिल्यांदा टाय करून दिली. मग सुपर ओव्हरमध्येही त्याने नाबाद आठ धावा फटकावल्या. अखेर सर्वाधिक चौकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेतेपद देण्यात आले.


बेन स्टोक्सला नामांकन का?
न्यूझीलंडर ऑफ द ईअर पुरस्कार समितीचे प्रमुख कॅमरन बॅनेट यांनी बेन स्टोक्सला सर्वोच्च पुरस्कारासाठी नामांकन देण्यामागील कारण सांगितले. ते म्हणाले, "स्टोक्स भलेही न्यूझीलंडकडून खेळला नाही, पण त्याचा जन्म ख्राईस्टचर्चमध्ये झाला आहे. इथेच त्याचे आई-वडील राहतात."