आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेंडाळे महाविद्यालयाबाहेर मुलींकडून युवकाला मारहाण, प्रेमावरून भडकला गँग्वार! व्हिडिओ व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - बेंडाळे महिला महाविद्यालयातील विद्यार्थीनींच्या दोन गटांत धुसफूस सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी एका गटातील मुलीने मित्रांची मदत घेत विद्यार्थीनीला शिवतीर्थ मैदानावर नेऊन मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. यांनतर सोमवारी दुपारी 2.30 वाजता पुन्हा एका युवकाला मारहाणीचा प्रयत्न केला. या प्रकाराने परिसरात गोंधळ उडाला होता. 


काय आहे प्रकरण?
- महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलीस शनिवारी दुपारी मारहाण करण्यात आली. संजना व मनीषा (पूर्ण नाव माहित नाही) या दोघींनी मित्रांच्या मदतीने एका विद्यार्थीनीला मारहाण केली. 'आमच्या मित्रांशी बोलते' या संशयावरुन मुलींत वाद सुरू झाले आहेत. शनिवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास अकरावीत शिकणाऱ्या मुलीस शिवतीर्थ मैदानावर नेऊन तिचे केस ओढून मारहाण केली. काही तरुणही येथे हजर होते. हे तरुण भांडण सोडवत असल्याचे व्हिडीओत दिसून येत आहे. तर काही विद्यार्थीनी भांडण सोडवत होत्या.
- सुमारे 20-25 मिनीटे हा वाद सुरू होता. यात अकरावीतल्या विद्यार्थीनीचे केस ओढून तिला मारहाण सुरू असताना व्हिडीओ काढण्यात आला. यानंतर हा वाद मिटला होता. दरम्यान, मारहाण करणाऱ्या मुलींची तक्रार करणार असल्याचे समजताच त्यांनी वाद मिटवण्यासाठी संबधित मुलींच्या पालकांना फोन केले. यानंतर सोमवारी पुन्हा एकदा अकरावीतील मुलगी व तिच्या मैत्रिणीस महाविद्यालयातून ओढत घेऊन जात शिवतीर्थ मैदानावर नेले होते. परंति, या वेळी संबधित मुलींनी आपल्या पालकांना माहिती दिली. त्यामुळे दुपारी 3 वाजता चार विद्यार्थीनींचे पालक महाविद्यालयात आले होते. हे पालक प्राचार्य डॉ. एस. एस. राणे यांच्यासोबत चर्चा करत असताना बाहेरच्या बाजूस टवाळखोर मुलींना धमक्या देत होते. दरम्यान, जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळी आल्यानंतर वातावरण निवळले. 
 


पालकांनी घेतली धाव 
मारहाण झालेल्या मुली पालकांसह दुपारी 4.30 वाजता जिल्हापेठ पोलिस ठाण्यात पाेहाेचल्या. मारहाण करणाऱ्या मुली, त्यांना मदत करणारे टवाळखोर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तयारी केली होती. परंतु, काही वेळाने एकमेकांची समजूत काढत हा वाद मिटला. 


...तर कारवाई करणार 
महाविद्यालयाबाहेर हा प्रकार घडला आहे. तरी देखील संबधित विद्यार्थीनींनी काही त्रास होत असल्यास आमच्याकडे तक्रार करणे अपेक्षित आहे. त्यांच्या तक्रारीनुसार तत्काळ योग्य ती कारवाई केली जाईल. 
डॉ. एस. एस. राणे, प्राचार्य, बेंडाळे महाविद्यालय 

 

बातम्या आणखी आहेत...