आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चरणामृत आणि पंचामृतमध्ये काय आहे फरक? हे घेतल्याने कोणता होतो लाभ?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवी-देवतांची पूजा, आरती झाल्यानंतर देवाचे चरणामृत दिले जाते. चरणामृत शब्दाचा अर्थ म्हणजे देवाच्या चरणापासून प्राप्त झालेले अमृत. हिंदू धर्मात चरणामृत खूप पवित्र मानले जाते. चरणामृताचे सेवन अमृतसमान मानले गेले आहे.


वैज्ञानिक महत्त्व
चरणामृताला केवळ धार्मिक दृष्टीनेच महत्त्व आहे असे नाही. वैज्ञानिक दृष्टीनेही चरणामृताचे महत्त्व आहे. आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात विविध रोग नष्ट करण्याची शक्ती असते आणि यामधील पाण्यात ती येते. चरणामृत तांब्याच्या पात्रात ठेवले जाते. त्यात तुळशीची पाने टाकतात. तांब्याच्या पात्रातील पाणी औषधीसमान असते. तुळसदेखील औषधी वनस्पती आहे. त्यामुळे चरणामृतात अनेक रोग नष्ट करण्याची शक्ती निर्माण होते.


चरणामृत सेवन करताना या श्लोकाचे स्मरण करण्याचे विधान आहे....
अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनम्।
विष्णो: पादोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते ।।


अर्थ : चरणामृताने अकाली मृत्यू येत नाही. देवाच्या चरणाचे अमृतरूपी जल समस्त पाप व्याधिंचे शमन करणारे आहे. भगवान विष्णुंच्या चरणाचे चरणामृत सेवन केल्यास पुनर्जन्म होत नाही.


पुढे जाणून घ्या, पंचामृत कसे बनवतात आणि याचे फायदे...

 

बातम्या आणखी आहेत...