आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या PF अकाउंटमध्ये जमा झाले 5 लाख रुपये, तर सरकार देईल 1.24 कोटी...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्‍ली-  तुमचे प्रॉव्हिडेंट फंड अकाउंट 10 वर्षे जुने असेल तर तुम्ही नोकरी बदलण्याचा किंवा त्या अकाउंटमधून पैसे काढण्याचा विचारही  करू नका. जर तुम्ही वेळेच्या आधी पैसे नाही काढले तर कंपाउंडिंगमुळे पीएफ अकाउंटमध्ये तुमचे पैसे वेगाने वाढतील. त्यामुळे तुम्ही जेव्हा रिटायर व्हाल तेव्हा तुमच्या अकाउंटमध्ये 1 कोटींपेक्षा जास्त रक्कम असेल.

 

तुमच्या अकाउंटमध्ये असतील 1.24 कोटी 

समजा तुमचे वय 35 आहे आणि तुमचे अकाउंट 10 वर्ष जुने आहे आणि तुमच्या पीएफ अकाउंटमध्ये 5 लाख रुपये आहेत. तुमची सध्याची बेसिक सॅलरी 20,000 रूपये आहे. दर तुमच्या पगारात दर वर्षाला 10 टक्के वाढ झाली तर ईपीएफवर 8.55 टक्के व्याजाच्या हिशोबाने 58 वर्ष वयात तुमच्या अकाउंटमध्ये 1.24 कोटी असतील. 

 

 

वय 35 वर्ष 
मंथली बेसिक सॅलरी 20,000 
पीएफमध्ये तुमचे मंथली कंट्रीब्‍यूशन 12 %
पीएफमध्ये इम्‍पलॉयर कंट्रीब्‍यूशन  12 %
सॅलरीत वार्षीक वाढ 10 %
रिटायरमेंट चे वय 58 वर्षे 

 पीएफ अकाउंटमधील सध्याची रक्कम

5 लाख रूपये 
पीएफवर व्याज दर  8.55 %
रिटायरमेंटनंतरचा फंड 1.24 कोटी रूपये 

 

बातम्या आणखी आहेत...