आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 संस्कारांमधील एक आहे कर्णवेध संस्कार, हे आहेत यामुळे होणारे 5 फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मामध्ये करण्यात येणाऱ्या 16 संस्कारांमध्ये कर्णवेध हासुद्धा एक संस्कार आहे. यामध्ये कान टोचले जातात. आजकाल कान टोचण्याची फॅशन जोरात सुरु आहे परंतु कधीकाळी असे करणे लोकांसाठी अनिवार्य होते. कारण यामागे केवळ धार्मिक नाही तर वैज्ञानिक तथ्य दडलेले आहे. आयुर्वेदानुसार कान टोचल्याने विविध प्रकारच्या आजारांचा धोका कमी होतो. येथे जाणून घ्या, कर्णवेध संस्काराशी संबंधित काही खास गोष्टी...


कर्णवेध संस्काराशी संबंधित खास गोष्टी 
- पूर्वीच्या काळी शुभ मुहूर्तावर मुलांच्या कानामध्ये मंत्र उच्चार करून कर्णवेध संस्कार केला जात होता- 
भद्रं कर्णेभि: श्रृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा:।
स्थिरैरंगैस्तुष्टुवां सस्तनूभर्व्यशेमहि देवहितं यदायु:।।
यजुर्वेद 25/21

- मंत्र उच्चार केल्यानंतर मुलाच्या उजव्या कानामध्ये पहिले आणि डाव्या कानामध्ये नंतर छिद्र पडले जात होते. मुलींसाठी डाव्या कानामध्ये पहिले आणि उजव्या कानामध्ये नंतर छिद्र पाडून सोन्याचे दागिने घातले जात होते.


कान टोचल्याने होतात हे 5 फायदे
- आयुर्वेदानुसार, कानाच्या खालील भागा (ear lobes)मध्ये एक पॉईंट असतो. या ठिकाणी छिद्र केल्यास हे मेंदूचा एक भाग ऍक्टिव्ह ठेवते.
- एक्यूपंक्चर के अनुसार, कान के निचले हिस्‍से के आस-पास आंखों की नसें होती हैं। इसी बिंदु को दबाने पर आंखों की रोशनी में सुधार होता है। 
- एक्यूपंक्चरनुसार, कान टोचताना केंद्रबिंदूवर दबाव पडल्यामुळे ओसीडी (एखाद्या गोष्टी गरजेपेक्षा जास्त चिंता), घाबरून जाणे आणि मानसिक आजार दूर होण्यास मदत मिळते.
- इअर लोब्समध्ये विविध असे प्रेशर पॉईंट्स असतात, जे प्रजनन अंग निरोगी ठेवण्यास सहायक ठरतात. पुरुषांच्या अंडकोष आणि वीर्य संरक्षणातही कान टोचल्याने लाभ होतो.
- मुलींचे कान टोचल्याने त्याची मासिक पाळी नियमित राहते. कान टोचल्याने हिस्टीरिया रोगामध्ये लाभ होतो.

बातम्या आणखी आहेत...