आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Benefits Of Government Schemes Not Getting Due To Change The Name Of Cast In Cast Certificates

'ग' ऐवजी लिहिले 'घ' तर 29 गावातील 11 हजार लोक 'एसटी' प्रवर्गातून गेले 'एससी' प्रवर्गात, यामुळे सरकारी योजनांचा मिळत नाहीये लाभ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धार - मध्यप्रदेशच्या धार जिल्ह्यात फक्त एका अक्षर बदलल्यामुळे 29 गावातील 11 हजार लोक अनुसूचित जमातीतून (एसटी) अनुसूचित जातीत गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बदनावर तालुक्यात मोगिया समाजाचे लोक राहतात. येथे बदनावर प्रशासनाने लोकांच्या जात प्रमाणपत्रावर 'मोगिया' ऐवजी 'मोघिया' लिहून प्रमाणपत्र देण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाहीये. 


ग्रामस्थांच्या मते, देश स्वातंत्र झाल्यापासून आमच्या जमीन महसूल दस्तऐवजात लिहिण्यात आलेल्या जातीनुसार आम्हाला जात प्रमाण देण्यात येत नाहीये. आमची जात बदलली जात आहे. 


हरिजन समाजाचेच जात प्रमाणपत्र देणार
बदनावर एसडीएम नेहा साहू यांच्ये म्हणणे आहे, की हे लोक मोगिया समाजात मोडत नाहीत. यामुळे त्यांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देता येणार नाही. त्यांना हरिजन जातीचेच प्रमाणपत्र देण्यात येईल. मोगिया समाजाची 22 हजार लोकसंख्या असून 5 हजार शिक्षित वर्ग आहे. तालुक्यातील 'निवासरत' समाजाला अनुसूचित जमातीचे जातप्रमाणपत्र जारी करण्यात आले होते. पण त्यांच्या मुलांच्या प्रमाणपत्रात जात बदलण्यात येत आहे. 

बातम्या आणखी आहेत...