पैसा दुप्पट करायचा / पैसा दुप्पट करायचा असेल तर केंद्र सरकारच्या या योजनांमध्ये गुंतवा, मिळेल इतका नफा; असे आहेत पर्याय

Nov 10,2018 06:08:00 PM IST

न्यूज डेस्क - सामान्य नागरिकांना बचत करण्यासाठी सरकार अनेक योजना देत आहे. या योजना पूर्णपणे सुरक्षित आणि परताव्याची पूर्ण हमी देणाऱ्या असतात. त्यापैकीच एक पोस्ट ऑफिसच्या 'किसान विकास पत्र' या योजनेमध्ये आपण गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही शाखेतून या योजनेचा लाभ घेता येतो. यामध्ये ठेवीची किमान रक्कम 1 हजार रुपये आहे. तर कमाल रकमेची कोणतीही मर्यादा नाही. ही योजना दरवर्षी 7.3% (compounded) व्याज देते. पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईट (www.indiapost.gov.in) वर दिलेल्या माहितीनुसार, या योजनेमध्ये 118 महिने म्हणजेच 9 वर्षे 10 महिने गुंतवणूक केल्यास रक्कम दुप्पट होईल. सोबतच यातून कर्ज देखील घेऊ शकता.


MIS वर मिळवू शकता निश्चित व्याज
>> पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेमध्ये (MIS) गुंतवणूक करून आपण दरमहा निश्चित व्याज मिळवू शकता. यामध्ये 4.5 लाख रूपये वैयक्तिकरित्या, तसेच 9 लाख रुपये संयुक्तरित्या गुंतवू शकता. योजनेचा गुंतवणूक कालावधी 5 वर्षे आहे. किमान 1500 रुपये जमा करुन मासिक उत्पन्न योजनेचे खाते उघडता येते.

>> समजा 'अ' व्यक्तीने या योजनेमध्ये 5 वर्षांसाठी 5 लाख रुपये गुंतवले आहेत. त्याचा व्याज दर 7.3 टक्के आहे. म्हणजे दर महिन्याला 'अ' ला 5 वर्षांसाठी 3250 रुपये मिळतील. मॅच्युरिटीनंतर 'अ' ला गुंतवलेले 5 लाख रुपये परत मिळतील.

रिकरिंग डिपॉझिट (RD)

>> रिकरिंग डिपॉझिट (RD) ही गुंतवणुकीची लोकप्रिय योजना आहे. यामध्ये निश्चित परताव्याची हमी असते. RD मध्ये प्रत्येक महिन्याला निश्चित कालावधीपर्यंत पैसे जमा करावे लागतात. ज्यांच्याकडे गुंतवणूक करण्याठी मोठी रक्कम नाही, ते RD मार्फत थोडी थोडी रक्कम जमा करून बचत करू शकतात.

>> यामध्ये मिळणारा व्याज दर तुमच्या ठेवीवर आणि पॉलिसी टेक्योरवर अवलंबून असते. यामध्ये 7.25% ते 9% व्याज दर मिळते. तर अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याज दर देत आहेत.

>> आपण 100 रू. पासून RD सुरू करू शकता. यामध्ये कमाल मर्यादा 1.5 लाख रूपये आहे.

X