आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैंजण फक्त शृंगाराची वस्तू नाही तर यामुळे होतात इतरही खास फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिलांचे एकूण 16 शृंगार सांगण्यात आले आहेत. या सोळा दागिन्यांपैकी एक आहे पैंजण. हा केवळ एक दागिना नसून यामुळे महिलांना आरोग्य लाभही प्राप्त होतात. पैंजणाशी संबंधित मान्यतेनुसार, याच्या आवाजाने घरात सकारात्मकता कायम राहते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार, जाणून घ्या, प्राचीन मान्यतेनुसार, स्त्रिया पैंजण का घालतात आणि यामुळे कोणते लाभ होतात...


# पैंजणाशी संबंधित आरोग्य लाभ
> पैंजणाचे धातू अर्थात चांदी किंवा सोने स्त्रियांच्या पायात असणे खूप लाभदायक आहे. पायात चांदी किंवा सोन्याचे घर्षण होणे हे स्त्रियांच्या हाडांकरता फायदेशीर असते. त्यामुळे पायांची हाडे मजबुत होतात. याशिवाय पैंजण घातल्यामुळे स्त्रियांच्या पायाच्या आकर्षणात भरच पडते.


# पैंजणाच्या आवाजामध्ये होता एक संकेत
> पैंजण घालण्यामागे एक कारण असे आहे, की प्राचीन काळात खास संकेतासाठी स्त्रिया पैंजण घालत होत्या. पूर्वीच्या काळी जेव्हा घरातील सर्व सदस्य एकत्र बसत होते, तेव्हा पैंजणाच्या आवाजामुळे स्त्री आपल्या दिशेने येत आहे, याचा अंदाज बांधला जाणे शक्य होत होते. पैंजणाच्या आवाजामुळे लोकांना कळत होते की एखादी स्त्री त्यांच्या आजूबाजूलाच आहे.


# पैंजणाशी संबंधित धार्मिक मान्यता
> पैंजणांच्या आवाजामुळे नकारात्मक गोष्टींचा प्रभाव कमी होतो आणि दैवी शक्तीचा प्रभाव वाढतो. घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते.

बातम्या आणखी आहेत...