शिवपुराण / पाऱ्यापासून निर्मित शिवलिंगाचे आहे विशेष महत्त्व, केवळ स्पर्शाने मिळते पुण्य

विविध औषधी मिसळून द्रवरूप पाऱ्याचे बंधन केल्यानंतर बनते पारद शिवलिंग

रिलिजन डेस्क

Dec 01,2019 12:15:00 AM IST

पूजा-पाठमध्ये दगडाव्यतिरिक्त वेगवेगळ्या धातूंचे शिवलिंगही ठेवले जाते. सर्व धातूंच्या शिवलिंग पूजेचे महत्त्व वेगवेगळे आहे. घरामध्ये स्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या धातूंचे शिवलिंग बाजारात सहजपणे मिळतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार, कोणत्याही धातूचे छोटेसे शिवलिंग घरात ठेवावे. धातूंमध्ये पारद म्हणजे पारा हा द्रवरूपात असतो आणि याचेही शिवलिंग बनवले जाते. या शिवलिंगाची पूजा केल्याने भक्ताच्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होऊ शकतात. पारद शिवलिंग घरामध्ये ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात. येथे जाणून घ्या पाऱ्यापासून निर्मित शिवलिंगाच्या काही खास गोष्टी...

  • कसे तयार होते पारद शिवलिंग

पारद शिवलिंग तयार करणे खूप अवघड काम आहे. सर्वात पहिले पारा शुद्ध केला जातो. त्यानंतर विविध औषधी मिसळून द्रवरूप पाऱ्याचे बंधन केले जाते म्हणजे ठोस बनवले जाते. या संपूर्ण प्रक्रियेला जवळपास 6 महिने लागतात, त्यानंतर पारद शिवलिंग तयार होते.


शिवपुराणानुसार

लिंगकोटिसहस्त्रस्य यत्फलं सम्यगर्चनात्। तत्फलं कोटिगुणितं रसलिंगार्चनाद् भवेत्।।

ब्रह्महत्या सहस्त्राणि गौहत्याया: शतानि च। तत्क्षणद्विलयं यान्ति रसलिंगस्य दर्शनात्।।

स्पर्शनात्प्राप्यत मुक्तिरिति सत्यं शिवोदितम्।।


अर्थ - लाखो-कोटी शिवलिंगाची पूजा केल्याने जे फळ प्राप्त होते त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त फळ पारद शिवलिंगाची पूजा आणि दर्शन केल्याने प्राप्त होते. पारद शिवलिंगाच्या केवळ स्पर्शाने सर्व पापातून मुक्ती मिळते.

  • घरामध्ये किती मोठे शिवलिंग ठेवावे

देवघरात ठेवण्यात येणाऱ्या शिवलिंगाचा आकार आपल्या अंगठ्यापेक्षा अधिक असू नये. शिवलिंग खूप संवेदनशील असते, यामुळे घरात अधिक मोठे शिवलिंग ठेवू नये. तसेच एकापेक्षा अधिक शिवलिंग ठेवणे टाळावे.

X
COMMENT