आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिझनेस डेस्क - तुमच्या आई-वडीलांचे वय 60 वर्षे असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी दर महिन्याला 10 हजार रुपयांच्या पेंशनची व्यवस्था करु शकता. भारतीय जीवन विमा कंपनी (एलआयसी) नेज्येष्ठ नागरीकांसाठी पंतप्रधान वय वंदन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पेंशनसाठी 23 मार्च 2020 पर्यंत नावनोंदणी करता येऊ शकते. जर तुमच्या आई-वडीलांकडे नियमित पैसे मिळण्याचा मार्ग नसेल तर तुम्ही दरमहा त्यांना 10 हजार रुपये पेन्शन मिळवून देऊ शकता.
एकाचवेळी करावी लागेल 15 लाखांची गुंतवणूक
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी व्यक्तीचे वय किमान 60 वर्षे असणे आवश्यक आहे. एखादी व्यक्ती ही पॉलिसी खरेदी करत असेल तर त्याला 10 वर्षांपर्यंत दरमहा, तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी किंवा वार्षिक पेंशन मिळेल. 10 वर्षानंतर पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाला आणि पॉलिसीधारक जिवंत असेल तर त्याला योजनेअंतर्गत त्याने गुंतवणूक केलेले सर्व पैसे परत मिळतील. याशिवाय पॉलिसीधारकाचा मृत्यू पॉलिसी कालावधीच्या आधी झाला तर गुंतवणूक केलेले पैसे त्याच्या कुटूंबियांना मिळतील. उदाहरणार्थ एका 60 वर्षांच्या व्यक्तीने या योजनेमध्ये 15 लाखांची गुंतवणूक केली तर त्या व्यक्तीला 10 वर्षांपर्यंत पेंशन मिळेल. या योजनेत तुम्ही 15 लाखांपेक्षा अधिक गुंतवणूक करू शकता.
आपत्कालीन परिस्थितीत परत मिळवु शकतात पैसे
आपातकालीन परिस्थितीत तुम्ही गुंतवलेले पैसे काढू शकता. घरातील आजारी व्यक्तीच्या उपचारासाठी पैसे मिळू शकतील. पॉलिसीमध्ये गुंतवलेल्या रकमेपैकी 98% रक्कम परत मिळते.
कर्ज मिळण्याची सुविधा
पंतप्रधान वय वंदना योजनेअंतर्गत रक्कम जमा केल्याच्या तीन वर्षांनंतर कर्ज घेता येते. पॉलिसीधारकाने जमा केलेल्या रकमेच्या 75% पर्यंत कर्ज त्याला मिळु शकते. जोपर्यंत तुम्ही कर्जाची रक्कम परत करत नाही तोपर्यंत दर 6 महिन्यांनंतर तुम्हाला व्याज द्यावे लागते. या व्याजाची रक्कम तुम्हाला मिळणाऱ्या पेंशनमधून वजा केली जाते.
15 ते 30 दिवसांच्या आत पॉलिसी रद्द करण्याचा पर्याय
पॉलिसी घेतल्यानंतर पॉलिसीधारक एखाद्या नियमाशी सहमत नसेल तर तो 15 दिवसांच्या आत पॉलिसी रद्द करु शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.