Home | Business | Gadget | benefits of solar ac in this summer

सोलार ए.सी. बाजारात दाखल, विजबीलापासून होणार कायमची सुटका

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 11, 2019, 05:04 PM IST

एकदाच भरावे लागतील एक लाख रूपये

 • benefits of solar ac in this summer

  यूटिलिटी डेस्क- उन्हाळ्यात 'एसीमध्ये' बसणे कोणाला आवडत नाही. पण जेवढा आनंद ए.सी.च्या थंड वाऱ्यामुळे मिळतो, वीजबिलामुळे तेवढीच चिंता वाढते. भीषण गरमीमध्ये ए.सी.चे बिल इतर हंगामापेक्षा तिप्पट वाढते. त्यामुळे आता आपणही आपले विजबील वाचवू शकता. म्हणून यासाठी आपल्याला सोलार ए.सी. खरेदी करावी लागेल. या ए.सी.ची विशेषता म्हणजे याचा उपयोग करण्यासाठी वीजबिल भरण्याची गरज नाही.

  Solar AC ची वैशिष्टे...

  कमी मेंटेनंस खर्च
  या ए.सीचा मेंटेनंस खर्च इतर ए.सीच्या तूलनेत खूप कमी आहे. अशा सोलार ए.सी उपलब्ध करणाऱ्या बाजारात अनेक कंपन्या आहेत. तसेच, या AC सोबत आपल्याला सोलार पॅनल प्लेट आणि एसी कनव्हर्टर देण्यात येते, त्यामुळे वीजेशिवाय आपण याचा उपयोग करू शकता.


  सुर्याची किरणं सरळ सोलार पॅनल प्लेट्सवर पडावेत म्हणून याला मोकळ्या जागेवर बसवण्यात येतात. तसेच, यामध्ये असलेल्या डिसी बॅटरीद्वारे इलेक्ट्रॉनिक करंट निर्माण होतो. त्यामुळे याच्या मदतीने ए.सी कनव्हर्टरद्वारे थंड हवा मिळते.


  1 टन Solar AC साठी आपल्याला ( ऑनलाइन किंमत) 90 ते 1 लाख रुपयापर्यंत खर्च करावे लागतील. पण तूम्हाला फक्त एकदाच एवढा खर्च करावा लागेल. त्यानंतर कोणताही खर्च यावर होणार नाही.

  बाजारातील इलेक्ट्रॉनिक AC किंमत यापेक्षा तिप्पटीने कमी असते. पण, त्याचे येणारे वर्षाचे बिल आपला खिसा रिकामा करते. 1 टनच्या इलेक्ट्रॉनिक एसीची किंमत जवळपास 20 ते 40 हजार रूपये असते.


  5 स्टार रेटिंग
  बाजारात उपलब्ध असणाऱ्या या Hybrid Solar AC ला 5 स्टार रेटिंग मिळाली आहे. हा एसी इलेक्ट्रॉनिक ए.सी.प्रमाणेच काम करतो. यामध्ये इतकाच फरक आहे की, यात पॉवरसाठी सोलार पॉवर, बॅटरी बँक आणि इलेक्ट्रॉनिक ग्रिड असे पर्याय देण्यात आले आहेत.


  एक टनच्या सोलर एसीची किंमत 99 हजार रूपये आणि 1.5 टनच्या एसीची किंमत 1,39000 रूपये ठेवण्यात आली आहे. तसेच, यामध्ये सोलर पॅनल, सोलर इंव्हर्टर आणि सर्व अक्सेसरीजचा समावेश आहे.

Trending