आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीर्थयात्रेने मन राहते प्रसन्न, आरोग्य लाभासोबतच वाढते आपले ज्ञान

2 वर्षांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक

प्रत्येक व्यक्तीने तीर्थयात्रा करावी. तीर्थयात्रा म्हणजे चारधाम, द्वादश ज्योतिर्लिंग, हरिद्वार, ऋषिकेश, मथुरा, काशी यासारख्या धार्मिक स्थळांवर जाऊन दर्शन-पूजन करणे. बहुतांश लोक तीर्थयात्रेकडे धार्मिक दृष्टिकोनातून पाहतात परंतु मंदिर आणि तीर्थयात्रा केल्याने धर्मलाभासोबतच इतरही लाभ होतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, तीर्थयात्रेशी संबंधित काही खास गोष्टी...

  • मानसिक तणाव कमी होतो

जे लोक वेळोवेळी तीर्थयात्रा करत राहतात, त्यांना मानसिक तणावातून मुक्ती मिळते. दैनंदिन जीवनात चालू असलेल्या अडचणींमुळे तणाव वाढतो. अशावेळी काही दिवस तीर्थयात्रेवर गेल्यास मन प्रसन्न होते. नवीन ऊर्जा मिळते. यात्रेवरून परतल्यानंतर आपण नवीन ऊर्जेने काम करू शकतो.

  • विचारांमधील सकारात्मकता वाढते

मंदिरांचे निर्माण वास्तुनुसार केलेले असते. मंदीराचे बांधकाम अत्यंत खास असते, येथे येणाऱ्या व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा मिळते. मंदिरात येणाऱ्या भक्तांचे नकारात्मक विचार नष्ट होतात. मंदिरांना ऊर्जेचे केंद्र मानले जाते. याच कारणामुळे मंदिर किंवा तीर्थस्थळावर गेल्यानंतर आपल्याला शांती मिळते. शांत मन आणि सकारात्मक विचारांनी केलेल्या कामामुळे यश प्राप्त होते.

  • ज्ञान वाढते

तीर्थस्थळावर गेल्याने आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणवंरील जीवनशैली समजते. विविध प्रहत-परंपरा माहिती होतात. पौराणिक गोष्टींचे ज्ञान वाढते. देव-देवतांशी संबंधित कथा माहिती होतात. देवता आणि भक्तीशी संबंधित ज्ञान मिळवण्याची संधी मिळते.

  • आरोग्यासाठी फायदेशीर

प्राचीन तीर्थ आणि मंदिर अशाठिकाणी बनवण्यात आले आहेत, जेथील नैसर्गीक वातावरण आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर राहते. मंदिरांमध्ये पायऱ्या असतात, ज्यावर चढ-उतार केल्याने आपला व्यायाम होतो. भजन-कीर्तनात टाळ्या वाजवल्याने ऍक्युप्रेशरचे लाभ मिळतात. घंटीच्या आवाजाने सकारात्मक ऊर्जा मिळते. तीर्थक्षेत्राचे पवित्र वातावरण आपल्याला आरोग्य लाभ प्रदान करते.

बातम्या आणखी आहेत...