आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीएएविरुद्ध प्रस्ताव मंजुर करणारे पश्चिम बंगाल देशातील चौथे राज्य; हा कायदा नागरिकांच्या विरोधात- ममता बॅनर्जी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पश्चिम बंगालपूर्वी केरळ, राजस्थान आणि पंजाब विधानसभेत सीएएविरोधात प्रस्ताव मंजुर झाला आहे
  • विरोधी पक्षांनी मतभेद विसरुन भाजपविरोधात एकत्र येण्याची हीच वेळ आहे- ममता बनर्जी

कोलकाता- पश्चिम बंगाल विधानसभेत आज(सोमवार) नागरिकत्व संशोधन कायदा (सीएए)विरुद्ध प्रस्ताव मंजुर झाला. मुख्यमंत्री ममता बनर्जी म्हणाल्या की, हा कायदा नागरिकांच्या विरोधात आहे आणि याला तात्काळ रद्द करायला हवं. बंगालपूर्वी केरळ, राजस्थान आणि पंजाबमध्येही या कायद्याविरोधात प्रस्ताव मंजुर झाला आहे.


राजस्थान विधानसभेत 25 जानेवारी, केरळ विधानसभेत 31 डिसेंबर 2019 आणि पंजाब विधानसभेत 17 जानेवारीला या कायद्याविरोधात प्रस्ताव मंजुर झाला.

एनआरसी, एनपीआर आणि सीएए एकसारखेच- ममता

ममता बॅनर्जी म्हणाल्या, सीपीएम आणि काँग्रेसने आपले राजकीय मतभेद विसरावे आणि फासीवादी भाजपविरोधात लढण्यासाठी एकत्र यावे. वेळ आली आहे, जेव्हा आपण सर्व विरोधकांनी आपल्यातील मतभेद विसरुन एकत्र यायला हवं. एनपीआर, एनआरसी आणि सीएए एकच आहे, हे सर्व संविधानाच्या विरोधात सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...