आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेलच्या रुममध्ये मिळाला प्रसिध्द अभिनेत्रीचा मृतदेह, नुकताच झाला होता घटस्फोट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/कोलकाता : बंगालची प्रसिध्द फिल्म आणि टीव्ही अॅक्ट्रेस पायल चक्रवर्तीचा मृतदेह बुधवारी संध्याकाळी सिलिगुडीच्या एका हॉटेलमध्ये संशयीत अवस्थेत मिळाला. तिने आत्महत्या केली आहे की, ही हत्या आहे, याचा पोलिस तपास करत आहेत. हॉटेल अथॉरिटीकडून मिळालेल्या माहितीनुसार, पायल या हॉटेलमध्ये मंगळवारी आली होती. ती बुधवारी सकाळी गंगटोकसाठी निघणार होती असे बोलले जातेय. सकाळी हॉटेल स्टाफने दार वाजवले तेव्हा काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा हॉटेलच्या टीमने पोलिसांना सूचना दिल्या. पोलिस दरवाजा तोडून मध्ये गेले, तेव्हा पायलचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मिळाला. 


पतीसोबत झाला होता घटस्फोट 
काही दिवसांपुर्वीच 36 वर्षीय पायलचा घटस्फोट झाला होता. यामुळे ती खुप तणावात राहत होती. तिला एक मुलगाही आहे. घटस्फोटानंतर पालक आपल्या पालकांसोबत कोलकाताच्या नेताजी नगरमध्ये राहत होती. पायल गंगाटोकला जाणार असे म्हणाली होती, यामुळे तिचा तिकडे काय संबंध होता याचा तपास पोलिस घेत आहेत. पायलने 'एक माशेर साहित्य सीरिज', चोखेर तारा तुई, गोएंदा गिन्नी सारख्या प्रसिध्द मालिकांमध्ये काम केले होते. यासोबतच ती आगामी बंगाली चित्रपट 'केलो'मध्ये काम करणार होती. 

बातम्या आणखी आहेत...