आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानॅशनल डेस्क/ बंगळुरू - एक म्हण आपल्या परिचयाची असेलच 'देव तारी त्याला कोण मारी'! बंगळुरूत बंगळुरू- टुमकूर हायवेवरही असेच झाले. येथे दोन बाइकची जबरदस्त धडक झाली, यात आईवडील रस्त्यावर उसळून आदळले. परंतु चकित करणारी बाब म्हणजे, बाइकवर बसलेला चिमुरडा तसाच राहून बाइक आपोआप चालत गेली. जवळजवळ अर्धा किमी बाइक आपोआप चालत होती, नंतर ती रस्त्याच्या कडेला पडली. त्याला किरकोळ दुखापत झाली. चमत्कारिक अपघाताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने शेअर केला जात आहे.
ट्रकखाली येऊ शकली असती बाइक
बाइकच्या मागे चालत असलेल्या कारच्या कॅमेऱ्यात हा अपघात रेकॉर्ड झाला. अपघातानंतर जेव्हा बाइक मुलाला घेऊन पुढे जात होती, तेव्हा सोबत ट्रकही जात होता. बाइक ट्रकखाली आली असती, परंतु दैव बलवत्तर म्हणून अर्धा किमी आपोआप चालून डिव्हायडरला धडकून खाली पडली. चिमुरडा डिव्हायडर लागलेल्या गवतावर पडला. त्याला थोडीसुद्धा दुखापत झाली नाही.
पुढच्या स्लाइडवर पाहा, या चमत्कारिक घटनेचे आणखी Photos व Video
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.