• Bengaluru changes team name without telling captain Virat Kohli; Kohli Chahal expressed surprise

आयपीएल / बंगळुरूने कर्णधार विराट कोहलीला न सांगता बदलले संघाचे नाव; कोहली-चहलने व्यक्त केले आश्चर्य

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(आरसीबी) टीमने आतापर्यंत एकही आयपीएल ट्रॉफी जिंकली नाही

दिव्य मराठी वेब टीम

Feb 13,2020 05:32:00 PM IST

स्पोर्ट डेस्क- इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळरू(आरसीबी)ने आपल्या सर्व सोशल मीडिया अकाउंट्सवरुन प्रोफाइल आणि कव्हरसह सर्व फोटो काढून टाकले आहेत. टीमने आज(गुरुवार) ट्वीट करत सांगितले की, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूबवरुन सर्व फोटो काढून टाकले आहेत. या गोष्टीची माहिती संघाचा कर्णधार विराट कोहलीला दिली नाही. यासोबतच आरसीबीने आपले नावही बदलून फक्त "रॉयल चॅलेंजर्स" केले आहे. यावर कोहलीने आश्चर्य व्यक्त केले आहे.

न्यूजीलँड दौऱ्यावर असलेल्या कोहलीने आज ट्वीट केले की, "पोस्ट काढून टाकण्यात आल्या आणि याबाबत कर्णधाराला काहीच माहिती नाही. आरसीबी, काही मदत लागत असेल तर सांगा." आरसीबीने 2008 आतपर्यंत एकही आयपीएल जिंकला नाहीये.

टीमच्या या कृत्यावर लेग स्पिनर युजवेंद्र चहलनेही आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याने ट्वीट केले, "अरे आरसीबी, ही कोणती गुगली आहे? तुमची प्रोफाइल फोटो आणि इंस्टाग्राम पोस्ट कुठे गेल्या?"

आरसीबी आणि मुथूट फिनकॉर्पदरम्यान करार


आरसीबीने मंगळवारी मुथूट फिनकॉर्पसोबत स्पॉन्सर म्हणून 3 वर्षांचा करार केला आहे. याअंतर्गत खेळाडूंच्या जर्सीवर समोर मुथूटचा लोगो आणि बंगळुरूमध्ये होणाऱ्या सामन्यादरम्यान मथूटच्या जाहीरात दाखवल्या जातील. या कराराच्या दुसऱ्या दिवशी आरसीबीने नाव आणि फोटो काढून टाकण्याचा प्रकार केला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संघात काही बदल केले जाऊ शकतात.

X
COMMENT