आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातृसेवा संकल्प यात्रा : 70 वर्षांच्या आईला स्कूटरवर बसवून घडवले 17 तीर्थस्थळांचे दर्शन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

म्हैसूर - कर्नाटकातील म्हैसूरचे डॉक्टर कृष्णाकुमार मातृसेवा संकल्प यात्रेवर निघाले आहेत. ७० वर्षांच्या आईला स्कूटरवर बसवून देशभरात सफर घडवत आहेत.  गेल्या दीड वर्षापासून त्यांनी आईला देशातील १७ तीर्थस्थळांचे दर्शन घडवले आहे. 


स्कूटरवरून त्यांनी नेपाळ व भूतानचा प्रवास केला आहे. नुकतेच ते अासाममधील तिनसुकिया येथे गेले होते. त्यांनी या प्रवासाबाबत सांगितले, माझी ही मातृसेवा संकल्प यात्रा आहे. ती १२ जानेवारी २०१८ पासून म्हैसूर येथून सुरू झाली आहे. आजवर चार हजार  किमीचा प्रवास झाला. सर्वप्रथम कर्नाटकातून केरळला गेलो. नंतर तामिळनाडू, पुदुच्चेरी, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गाेेवा, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि बिहारपर्यंत प्रवास केला आहे. सोबतच या राज्यांतील तीर्थस्थळे व धार्मिक स्थळांचे दर्शन घेतले. आता अरुणाचल प्रदेशातील परशुराम कुंडाकडे निघाले आहेत. आईवरील त्यांचे प्रेम पाहून लोक त्यांना श्रावणबाळ म्हणत आहेत. 


आईच्या सर्व इच्छांची पूर्ती करणारे डॉ. कृष्णा
आई चुडारत्न (वय ७०) सांगतात, मला कृष्णासारखा मुलगा मिळाला हे भाग्य. पतीच्या निधनानंतर त्यानेच मला खूप आधार दिला. माझी कोणतीही छोटी इच्छा पूर्ण करतो. आता तीर्थयात्रेसाठी स्कूटरवरून नेतो आहे.