आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bengluru Debt Ridden Man Kills Own Family After Mass Suicide Plan Fails, Daughter Records Video

कर्जात बुडालेले अख्खे कुटुंब करणार होते Mass Suicide, ऐनवेळी पत्नी पलटली; संतप्त पतीने अख्खे कुटुंब संपवले...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेंगळुरू - बेंगळुरू पोलिसांनी एका 48 वर्षीय व्यक्तीला आपल्याच कुटुंबाच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे. त्याने आपल्या 12 वर्षांच्या मुलाला फासावर लटकवले. तत्पूर्वी आपल्या पत्नीला (45) देखील ठार मारले. त्याला एक मुलगी देखील होती. परंतु, ऐनवेळी लपल्यामुळे तिचा जीव वाचला. त्याच मुलीने लपून संपूर्ण घटनाक्रमाचा व्हीडिओ बनवला. यामध्ये नराधमाने कसे आपल्या पत्नी आणि मुलाची हत्या केली हे दिसून येत आहे. याच व्हीडिओच्या आधारे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. चौकशी केली तेव्हा अख्खे कुटुंब आत्महत्या करणार होते अशी माहिती समोर आली आहे.


बेंगळुरूत राहणारा 45 वर्षीय आरोपी आपल्या कुटुंबासोबत चिटफंडचा व्यवसाय करत होता. 45 वर्षीय पत्नी, 17 वर्षांची मुलगी आणि 12 वर्षांचा मुलगा असा त्याचा कुटुंब होता. चिटफंडवर उदरनिर्वाह होत नसल्याने पत्नी देखील काम करत होती. तरीही ठेवीदारांचे पैसे परत करू शकले नाही आणि कुटुंबाच्या डोक्यावरील कर्ज वाढत गेले. यालाच कंटाळून कुटुंबाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, ऐनवेळी पत्नी आणि मुलांनी आपला विचार बदलला. त्यावर आरोपी पती इतका संतापला की त्याने स्वतःच आपल्या पत्नीचा खून केला. यानंतर 12 वर्षांच्या मुलाला फासावर लटकवून जीव घेतला. मीडिया रिपोर्टनुसार, सर्वांना ठार मारून तो देखील आत्महत्या करणार होता. परंतु, पत्नी आणि मुलाचा खून केल्यानंतर त्याने पोलिस स्टेशन गाठले आणि पत्नीनेच आपल्या मुलाचा खून करून आत्महत्या केली अशी तक्रार केली. पोलिसांना त्यावर विश्वास बसला नाही.


व्हीडिओमध्ये नेमके काय?
कसे-बसे तिने आपला जीव वाचवला आणि शेजाऱ्यांकडे जाऊन मदत मागितली. आपला सख्खा बापच आई आणि भावाचा खून करत असल्याचे त्या मुलीने आपल्या डोळ्यांनी पाहिले होते. एवढेच नव्हे, तर आपल्या मोबाईलमध्ये तिने लपून रेकॉर्डिंग सुद्धा केली. व्हीडिओमध्ये दिसून आले की आरोपीने सुरुवातीला पत्नीचा खून केला. यानंतर आपल्या मुलासाठी गळफास तयार करून त्याला लटकवले. धक्कादायक बाब म्हणजे, तो मुलगा आत्महत्येसाठी तयार होता असा भास होतो. कारण, व्हीडिओमध्ये त्या मुलाने काहीच विरोध केला नाही. मुलीने आपल्या मोबाईलचे रेकॉर्डिंग पोलिसांना सुपूर्द केले. तसेच तिचा जबाब नोंदवून घेतला जात आहे.