Home | International | Other Country | Benjamin netanyhu looking for fifth term as Israeli PM In general elections

तीन-तीन विवाह, जीवाची बाजी लावून वाचवले होते जहाज, आता पाचव्यांदा बनले इस्रायलचे पंतप्रधान

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 11, 2019, 10:32 AM IST

इस्रायलच्या संसदेत आतापर्यंत कुठल्याही एका राजकीय पक्षाला बहुमत मिळाले नाही

 • Benjamin netanyhu looking for fifth term as Israeli PM In general elections

  इंटरनॅशनल डेस्क - इस्रायलच्या पंतप्रधानपदी पाचव्यांदा आणि सलग चौथ्या वेळी बेंजामिन नेतन्याहू यांची निवड झाली आहे. 120 सदस्य संख्या असलेल्या इस्रायलच्या नेसेट अर्थात संसदेत आतापर्यंत कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळालेले नाही. या देशात नेहमीच आघाडींची सत्ता स्थापित केली जाते. यावेळी नेतन्याहूंना इस्रायलचे माजी लष्करप्रमुख बेनी गँट्झ यांनी आव्हान दिले होते. नेतन्याहूंनी एकेकाळी सैन्यात असताना आपल्या जीवाची बाजी लावून जहाज वाचवले होते. तर त्यांचे मोठे बंधू योनी नेतन्याहू दहशतवादविरोधी मोहिमेत शहीद झाले होते.


  असे बनले पंतप्रधान...
  नेतन्याहू यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1949 रोजी नव्याने स्थापित झालेल्या तेल अवीव इस्रायलमध्ये झाला. 1967 मध्ये ते इस्रायलच्या संरक्षण दलात सामिल झाले. यानंतर 'सय्यद मट्टल' ऑपरेशन दलात प्रवेश घेऊन त्या मोहिमेचे नेतृत्व केले. 1972 मध्ये त्यांनी हायजॅक झालेले जहाज वाचवले होते. यानंतर 1976 मध्ये अमेरिकेत परतले आणि मॅसाच्युसेट्स इस्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी येथून आर्किटेक्ट आणि बिझनेस मॅनेजमेंटची पदवी मिळवली. ते इस्रायलचे 9 वे आणि विद्यमान पंतप्रधान आहेत. ते केनेट आणि लिकुड पार्टीचे अध्यक्ष देखील आहेत. याव्यतिरिक्त नव्याने स्थापित इस्रायलमध्ये जन्म घेणारे ते पहिले पंतप्रधान आहेत.


  तीनपैकी एका भावाचा मृत्यू
  आपले सर्वात मोठे बंधू योनी यांच्या मृत्यूनंतर नेतन्याहू इस्रायलला परतले. योनी यांचा मृत्यू युगांडा येथे हायजॅक केलेल्या विमानाची सुटका करून घेताना मृत्यू झाला होता. बेंजामिन नेतन्याहू यांना आणखी दोन भाऊ आहेत.


  तीन वेळा केला विवाह
  - नेतन्याहू यांनी तीनदा विवाह रचला आहे. पहिल्या पत्नीचे नाव मिरियम वीझमन असे होते. 1972 ते 1978 पर्यंत टिकलेल्या या विवाहामध्ये त्यांना नोआ नामक एक मुलगी झाली.
  - फ्लेर कॅट्स नावाच्या महिलेसोबत त्यांनी दुसरा विवाह केला. 1981 ते 1984 पर्यंत टिकलेल्या या विवाहानंतर त्यांनी घटस्फोट घेतला.
  - नेतन्याहू यांच्या तिसऱ्या आणि विद्यमान पत्नी सारा ह्या मानसोपचार तज्ञ आहेत. त्यांना दोन आपत्ये असून येयर आणि अवनेर अशी त्यांची नावे आहेत.


  दहशतवादावर लिहिली अनेक पुस्तके...
  त्यांनी दहशतवाद विषयावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यामध्ये 'सेल्फ-पोर्ट्रेट ऑफ द हिरो: द लेटर्स ऑफ जोनाथन नेतन्याहू (1963-76), इंटरनॅशनल टेरररिझ्म: चॅलेंज अॅन्ड रिस्पाँस (1979), टेरररिझ्म: हाऊ द वेस्ट कॅन विन (1987), द प्लेस इन द नेशन्स: इस्रायल अॅन्ड द वर्ल्ड (1992), फायटिंग टेररिझ्म: हाऊ डेमोक्रेसीझ कॅन डिफीट डॉमेस्ट‍िक अॅन्ड इंटरनॅशनल टेरररिज्म (1996) इत्यादींचा समावेश आहे.

Trending