Home | Business | Gadget | Best App For Call Recording : You Can Record Any Call

हे आहे Best रेकॉर्डिंग App, कुठलाही कॉल करू शकता रेकॉर्ड

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 25, 2018, 03:40 PM IST

कॉल रेकॉर्डिंगचे फीचर असलेले मोजकेच स्मार्टफोन सध्या उपलब्ध आहेत. आपल्या फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंगचे फीचर नसतानाही आपण कॉल

 • Best App For Call Recording : You Can Record Any Call

  गॅजेट डेस्क - कॉल रेकॉर्डिंगचे फीचर असलेले मोजकेच स्मार्टफोन सध्या उपलब्ध आहेत. आपल्या फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंगचे फीचर नसतानाही आपण कॉल रेकॉर्ड करू शकता. यासाठी आपल्याला एक अॅप इंस्टॉल करावे लागणार आहे. हा एक फ्री अॅप असून तो गुगल प्ले स्टोरवरून इंस्टॉल केला जाऊ शकतो. याच्या अनोख्या फीचर्समुळे याला बेस्ट कॉल रेकॉर्डिंग म्हटले जात आहे.

  या अॅपचे नाव Call Recorder ACR असे आहे. डाऊनलोड करणाऱ्या अनेकांनी हे अॅप हेल्पफुल असल्याचे म्हटले आहे. एकदा हे अॅप इंस्टॉल केल्यानंतर ओपन करावे. यानंतर दिलेल्या पर्यायांमध्ये enable हा पर्याय निवडून अॅप ऑन करावे.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या प्रोसेस आणि फीचर्स..

  (नोट - हे अॅप मोटोरोला फोनमध्ये काम करणार नाही.)

 • Best App For Call Recording : You Can Record Any Call

  ऑटो डिलीट
  एकदा अॅप एनेबल केल्यानंतर फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंग सुरू होईल. या अॅपमध्ये ऑटो डिलीटचे ऑप्शन सुद्धा आहे. हा पर्याय निवडल्यास जुने होत जाणारे कॉल रेकॉर्ड आपो-आप डिलीट होत राहतील. यामुळे, स्मार्टफोनची मेमरी व्यर्थ होणार नाही.

 • Best App For Call Recording : You Can Record Any Call

  रिकॉर्डिंगला पासवर्ड
  आपण केलेल्या फोन कॉल रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवण्यासाठी झालेल्या रेकॉर्डिंग लॉक सुद्धा करता येतील. या अॅपमध्ये रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्डने लॉक करण्याची सुविधा आहे. यासाठी एक पासवर्ड निवडावा लागेल. जेणेकरून इतर कुणी आपल्या फोनमधील रेकॉर्डिंग ऐकू शकणार नाही.

   

Trending