आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांसाठी खास बनवले आहेत हे 5 गॅजेट्स, पिंपल रिमूव्ह आणि हेअर रिमुव्हसाठी होतो उपयोग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क- आज बाजारात अनेक प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स उपलब्ध आहेत, ज्यांचा वेगवेगळा उपयोग केला जातो. पण आता यामध्ये अनेक मेकअपसंबंधी गॅजेट्सचाही समावेश आहे. पिंपल्स, स्किन क्लीन करण्यासाठी किंवा स्किनवरून हेयर रिमूव्हसाठी सर्व प्रकारचे स्किन गॅजेट्स आपल्याला मिळतील. येथे जाणून घ्या अशा गॅजेट्सविषयी ज्यांचा आपण घरबसल्या वापर करू शकता.


स्किन ट्रीटमेंट गिजमो
जर आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर या गॅजेटद्वारे आपण त्यांना काढून टाकू शकता. याचा वापर करणे अतिशय सोपे आहे. त्यासाठी डिव्हाइसला सुरू करून पिंपल्सवर 10 सेकंदासाठी ठेवले जाते. त्यामुळे पिंपल्स फुटतात आणि दोन ते तीन दिवसात चेहरा पुर्णपणे ठिक होतो. या डिव्हाइसमधून जी लाइट येते ती पिंपल्समध्ये असलेले बॅक्टीरियाला नष्ट करते. त्यानंतर आपला चेहरा चांगला होतो. त्यामुळे हे डिव्हाइस आपले पिंपल्स ठिक करण्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. याची किंमत 12 हजार पाचशे रूपये आहे.


ब्राउन स्किल-एपिल 7 स्किनस्पा
या गॅजेटद्वारे शरीरावरील केस रिमुव्ह केले जातात. यासोबत वेगवेगळे सामान येते आणि त्यांचा उपयोगही वेगवेगळा आहे. हे गॅजेट चार्जेबल बॅटरीसोबत येते, ज्याला USB चार्जरद्वारे चार्च केले जाऊ शकते. चार्च केल्यानंतर याला हेअर रिमूव्ह करण्यासाठी वापरता येते. तसेच या डिव्हाइसमध्ये एक LED लाइटसुद्धा देण्यात आला आहे, ज्यामुळे आपण हेअर रिमुव्ह करताना बॉडी पार्ट बघू शकता. पण लक्षात ठेवा याचा उपयोग चेहऱ्यावर करू नये. हे गॅजेट खरेदी करण्यासाठी आपल्याला 16 हजार पाचशे रूपये मोजावे लागतील.


स्किन ग्लाइड हेअर रिमूव्हर
महिला हेयर रिमूव्ह करण्यासाठी वॅक्स वापर करतात, पण आता हे काम हेअर रिमूव्हल डिव्हाइसद्वार अतिशय सोपे आहे. यामध्ये केस काढण्यासाठी 6 इंडिकेटर लाइट देण्यात आले आहेत. यामध्ये एक स्किन टॉन बर्न लाइट आहे, याचा वापर करून निघणारे केस लगेच जळतातसुद्धा. म्हणजे आपल्या शरीरावर एक केस राहता कामा नये. यासोबतच यामध्ये एक सेंसर लाइटही देण्यात आला आहे, जो स्किनला सुरक्षित ठेवतो. या गॅजेटची किंमत 14 हजार पाचशे रूपये आहे.


फ्लोरियो लुना मिनी फेशिअल
या फेशिअल गॅजेटचा उपयोग चेहरा साफ करण्यासाठी होतो. या गॅजेटचा वापर करणे अत्यंत सोपे आहे. त्यासाठी चेहऱ्यावर फेशिअल क्रिम लावल्यानंतर हातात पकडून चेहऱ्यावर फिरवावे. हे गॅजेटमध्ये बॅटरी देण्यात आली आहे. म्हणजे चार्जिंग करून आपण कधीही याचा वापर करू शकतात. तसेच, आपण बाथरूम, डायनिंग रूम, बेडरूममध्ये टी.व्ही बघतानाही याचा उपयोग करू शकतात. डिव्हाइस चालू-बंद समजण्यासाठी यामध्ये एक LED लाइट दिला आहे. याला चार्ज करण्यासाठी एक USB चार्जर देण्यात आला आहे. या गॅजेटची किंमत 9 हजार पाचशे रूपये आहे.


फिलिप्स सोनिकेअर एअरफ्लॉस
फिलिप्सचे डिव्हाइसद्वारे आपले दात एक मिनिटांत स्वच्छ होतील. याची विशेष बाब म्हणजे दातामध्ये असलेले सर्व किटाणूंची सफाई होते. या वापर करण्यासाठी यामध्ये पाणी भरावे लागते आणि नंतर याच्या प्रेशरने दातांची स्वच्छता करते.या प्रोडक्टसोबत UK प्लगच्या दोन पिन दिल्या जातात. याची बाजारात किंमत 7 हजार तिनशे रूपये आहे.

बातम्या आणखी आहेत...