आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

180 रूपयांत चांगल्या क्वालिटीचे फुल साइज जॅकेट, स्वेटरची किंमत 100 रूपयांपेक्षा कमी, असे आहे भारतातील स्वस्त वूलन मार्केट...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क- देशभरात थंडीची लाट सुरू झाली आहे. दिवसभर टेम्प्रेचर हाय असतं पण रात्री मात्र तेच खुप कमी होत आहे. यामुळेच थंडीचे प्रमाण वाढत आहे. यातच आता थंडीपासून वाचण्यासाठी स्वेटर किंवा जॅकेटची गरज भासत आहे. हे जॅकेट शोरूममध्ये 1000 रुपयांपासून ते 3000 हजार रूपयांपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त किमतीचे  असू शकतात. पण भारतात असे काही मार्केट आहेत जिथे खुप स्वस्त किमतीत स्वेटर आणि जॅकेट मिळतात. 

 

गांधी नगर
दिल्लीच्या गांधी नगरमध्ये कपड्यांची 15 हजारांपेक्षा जास्त दुकाने आहेत. या ठिकाणावरून देशभरात कपडे विकले जातात. या मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीचे कपडे होलसेल दरात मिळतात. स्वेटर फक्त 100 रूपयांत तर जॅकेट 180 रूपयांत मिळते. मार्केटमध्ये लहान मुलांची जीन्स 35 रूपयांत तर, फुल साइज जीन्स 80 रूपयांत मिळते.

 

या कारणांमुळे स्वस्त असतात कपडे

या मार्केटमध्ये अनेक दुकानदारांच्या स्वत:च्या कपडे बनवण्याच्या कंपन्या आहेत. यामुळेच त्यांना होलसेलमध्ये कपडे विकुन फायदा मिळतो. चांगल्या क्वालिटीचे कपडेदेखील येथे स्वस्त मिळतात. गांधी मार्केट सोबतच चांदनी चौक, सरोजनी नगर, करोल बाग आणि शाहदरामध्ये स्वस्त होलसेल कपड्यांचे मार्केट आहे.

 

बातम्या आणखी आहेत...