आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षात अनेकदा विदेशी जात असाल तर ‘मल्टिट्रिप ट्रॅव्हल’ विमा योग्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सध्या सुट्यांचा हंगाम सुरू आहे. काही लोक फिरायला निघाले आहेत, तर काही फिरायला जाणार आहेत. अलीकडच्या वर्षात विदेशात फिरायला जाण्याची प्रथा वाढली आहे. मात्र, आताही अनेक प्रवासी ट्रॅव्हल इन्शुरन्स घेण्यासाठी तेवढे सजग नाहीत. अनेक वेळा तर गरज असेल त्याच वेळी असा विमा काढला जातो. युरोपातील अनेक देशांमध्ये जाण्यासाठी आधी ट्रॅव्हल इन्शुरन्स अनिवार्य आहे. व्हिसाच्या कागपत्रांसोबत या विम्याची कागदपत्रे द्यावी लागतात. लोकांनीही या विम्याचे महत्त्व समजून घ्यायला हवे. उदाहरणासाठी विदेशी प्रवासादरम्यान तुमचा पासपोर्ट हरवल्यास डुप्लिकेट किंवा नवीन पासपोर्ट घेण्यासाठीचा खर्च विमा कंपनी देते. जर तुमचे सामान हरवले तर त्याचीही भरपाई विम्यातून होऊ शकते. तुमचे सामान पोहोचण्यासाठी उशीर झाल्यास तुम्हाला अचानक काही अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करावी लागते, त्याचाही पैसा कंपनी रिफंड करते. विदेशात तुम्ही आजारी पडला किंवा तुमच्यासोबत एखादा अपघात घडला तर तुम्हाला कॅशलेस हॉस्पिटलायझेशची सुविधा मिळते किंवा तुमच्या जवळच्या नातेवाइकाकडे जाण्यापर्यंतचा खर्च कंपनी करते. प्रवासादरम्यान सामान चोरी होणे किंवा क्रेडिट-डेबिट कार्डमध्ये फसवणूक होणे सामान्य बाब आहे. हेदेखील या विम्यात कव्हर होते. मात्र, असा विमा काढताना काही मुद्दे लक्षात घ्यावे लागतात.
 
> काही क्रेडिट कार्ड किंवा गृह विम्यामध्ये ट्रॅव्हल इन्शुरन्सचाही समावेश असतो. त्यामुळे नवीन विमा घेण्याआधी तुम्हाला आधीपासूनच ही सुविधा मिळालेली तर नाही ना, याची तपासणी करून घ्या.  
> ट्रॅव्हल सेवेमध्ये मेडिकल कव्हरचा भाग लक्षपूर्वक पाहून घ्या. काही विमा कंपन्या विशिष्ट परिस्थितीमध्ये व्हायरल इन्फेक्शन कव्हर करत नाहीत.  
> सामान्यपणे लोक बॅग्ज आणि इलेक्ट्रॉनिक्स तसेच किमती वस्तू यांच्यातील फरक ओळखत नाहीत. बॅग्जमध्ये दररोज कामात येणाऱ्या वैयक्तिक वस्तूंचाच समावेश असतो. इलेक्ट्रॉनिक्स आणि किमती वस्तूंसाठी विम्याचे स्वतंत्र नियम असतात. जर तुमच्याकडे इन्व्हॉइसची कॉपी नसेल तर कंपनी तुम्हाला विमा कव्हरची रक्कम देणार नाही.  
> जर तुम्ही वर्षभरात पाच ते सहा वेळा विदेशी प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी मल्टिट्रिप पॉलिसी चांगला पर्याय आहे. यामध्ये एका वर्षात तुम्ही कितीही प्रवास केला तरी सर्व यात्रा विम्यात कव्हर होतील. मल्टिट्रिप पॉलिसी कमी खर्चिक असते.  
> अनेकदा तुम्हाला अचानक विदेशी यात्रा रद्द करावी लागते. त्यामुळे तुमची विमा पॉलिसी काळजीपूर्वक वाचा. कारण सर्व विमा कंपन्या यात्रा रद्द झाल्यास विमान तिकीट किंवा हॉटेल बुकिंगमध्ये होणाऱ्या नुकसानीची भरपाई करत नाहीत.  
> पॅसिफिक आशिया ट्रॅव्हल असोसिएशन (पाटा) नुसार भारतातून विदेशात फिरण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. २०१४ मध्ये येथून सुमारे १.८ कोटी लोक विदेशात फिरण्यासाठी गेले होते. वार्षिक ११ टक्क्यांनी सरासरी वाढीच्या दृष्टीने २०२० मध्ये ही संख्या ३.५ कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. घटनांवर तुम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही. त्यामुळे सावधगिरी हाच यावरील उपाय आहे. त्यामुळे तुम्हाला होणारे नुकसान तुम्ही कमी करू शकतात.  

 

बातम्या आणखी आहेत...