आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केमिकलयुक्त शेविंग क्रीमला म्हणा Bye-Bye, ट्राय करा हे देशी उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेविंग क्रीम संपली असेल तर काळजी करण्याचे कारण नाही. तुमच्या किचनमध्ये अशा अनेक गोष्टी उपलब्ध आहेत ज्या तुमच्या त्वचेला शेविंग क्रीमपेक्षा जास्त सॉफ्ट बनवतील आणि तुम्हाला क्लोज शेवमध्ये हेल्प करतील. जाणुन घ्या कोणकोणत्या आहे त्या 8 गोष्टी...

 

1. कच्चे दूध
कच्चे दूध चेह-यावर लावल्याने स्किन आणि केस सॉफ्ट होतात आणि शेव चांगल्या प्रकारे करता येते.

 

2. मध
मध कोमट पाण्यात टाकून याने चेह-याची मसाज करा. केस सॉफ्ट होतील आणि शेविंग चांगली होईल.

 

3. खोबरे तेल
शेविंग करण्याअगोदर खोबरेल तेलाने त्वचेची हलकी मसाज करा. यामुळे रेजर बर्न आणि ड्रायनेसपासून सुटका मिळते.

 

4. बटर
हे एक चांगले मॉश्चरायजर आहे. हे कडक केसांना सॉफ्ट बनवते ज्यामुळे ते सहज निघतात.

 

5. केळी
शेविंग क्रीम नसेल तर त्वचेवर केळीची पेस्ट लावून मसाज करा. यानंतर शेविंग केली तर सहज शेव होईल.

 

6. पपई
यामधील पापेन नामक एंजाइम त्वचेचे रॅशेज आणि जळजळ दूर करते. चेह-यावर मसाज करुन नंतर शेव करा.

 

7. एलोवेरा जेल
हे आरामदायक गारवा देते. याने त्वचेवर हलकी मसाज करा आणि नंतर शेविंग करा. जळजळपासून आराम मिळेल.

 

8. बदाम तेल
शेविंग करण्याअगोदर तेलाने मसाज केल्याने शेविंग करताना जळजळ होणार नाही. इरिटेशन होत नाही. स्किन सॉफ्ट होते.

बातम्या आणखी आहेत...