आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात गुंतवणुकीची सर्वोत्तम वेळ; उत्पादन वाढले, टॅक्स कमी : मोदी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकॉक : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये १६ व्या आसियान- भारत संमेलनात सहभागी झाले. त्यांनी सांगितले की, हिंद- प्रशांत क्षेत्राच्या दृष्टीने भारतासाठी ईस्ट अॅक्ट नीती (पूर्वेत काम करा नीती) महत्त्वाची आहे. आसियान याचा मूळ हिस्सा आहे. भारत याला आणखी दृढ करेल. याआधी मोदींनी एका कार्यक्रमात कंपन्यांना सांगितले की, भारतात गुंतवणुकीसाठी सर्वात चांगली वेळ आहे. तुम्ही या, जसे जागतिक बँकेला हवे आहे तसेच भारतात व्यवसायासाठी आणि राहण्यासाठी योग्य वातावरण आहे. येथे एफडीआय, फॉरेस्ट कव्हर, पेटेंट्स आणि उत्पादन वाढत आहे. तर कराचे दर आणि भ्रष्टाचार कमी झाला आहे. येथे लोकांसाठी अनुकूल कर व्यवस्था आहे. भारत लवकरच ५ ट्रिलियनची अर्थव्यवस्था होईल. २०१४ पर्यंत भारताचा जीडीपी सुमारे २ ट्रिलियन डॉलर होती. आता तो ३ ट्रिलियन झाला आहे. देशात पाच वर्षात २८६०० कोटी डॉलरची एफडीआय आली आहे.

पीएम मोदी थायलंड, इंडोनेशिया, म्यानमारच्या प्रमुख नेत्यांना भेटले

ईस्ट अॅक्ट : काँग्रेस सरकारात सुरुवात, बदल करत एनडीएने स्वीकारले, चीनचा प्रभाव कमी करण्याचा हेतू
सुरुवात : भारताने १९९१ मध्ये ईस्ट अॅक्ट नीती किंवा पूर्वेकडे बघा नीती सुरू केली. तेव्हा देशाचे पंतप्रधान नरसिंह राव होते. एनडीए सरकारने २०१४ मध्ये तिला पूर्वेत काम करा नीती म्हटले. त्यात काही बदल केले.

मुख्य लक्ष्य : ईस्ट अॅक्ट नीतीचा हेतू भारताच्या व्यापाऱ्याची दिशा शेजारी किंवा पश्चिमेकडील देशांपासून हटवून दक्षिण-पूर्व आशियाकडे करणे आहे. आधी ती आर्थिक एकीकरण वाढवण्यापुरती होती. आता यात संरक्षण एकीकरणही जोडले आहे. याचा हेतू आसियान क्षेत्रात चीनचा वाढता प्रभाव रोखणे आहे.

कसे : अासियान देशांशी मजबूत संबंध बनवण्यावर भर. यासाठी तीन सी संस्कृती, कनेक्टिव्हिटी आणि व्यापारला प्राधान्य देणे.

थायलंड ते गुवाहाटी- बँकॉक विमान सेवेवर चर्चा
माेदींनी थायलंडचे पीएम प्रयुत चान ओचा, इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांची भेट घेतली. थायलंडच्या पंतप्रधानांशी गुवाहाटी- बँकॉक विमानसेवा आणि रानोंग ते कोलकाता, चेन्नई, विशाखापट्टणम मालवाहू सेवेवर चर्चा झाली. इंडोनेशियाचे राष्ट्रपती विडोडो यांच्याशी हिंद- प्रशांत क्षेत्रावर चर्चा.

ताश्कंद: भारत-उझबेकिस्तान यांच्या 3 एमओयूवर स्वाक्षऱ्या
ताश्कंद : भारत आणि उझबेकिस्तान यांनी सैन्य चिकित्सा- शिक्षण क्षेत्रात तीन एमओयूवर स्वाक्षऱ्या केल्या. दोन्ही देशांचे सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि बखोदिर निजामोविच यांच्यात ताश्कंदमध्ये बैठक झाली. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, जर करार झाला तर दोन्ही देश आपले सैन्य शिक्षण संस्थांमध्ये एक- दुसऱ्याचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतील. सैन्य चिकित्सेशी संबंधित औषधी आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करतील.
 

बातम्या आणखी आहेत...