आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी दूर करू शकता अँड्रॉइड फाेनमधील ओवरहीटिंग समस्या; जाणून घ्या खास टीप्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅझेट- डिस्प्ले ब्राइटनेस जास्त असणे, जास्त वेळापर्यंत वाय-फायचा उपयाेग करणे, जास्त वेळ गेम्स खेळणे या कारणामुळे फाेन गरम हाेत असताे. कधी कधी उन्हाळ्यात ४० ते ४५ अंशापर्यंत तापमान असल्यासही ही समस्या उद‌्भवते. कधी कधी तर फाेन चार्जिंगला लावल्यास बॅटरी फुटते. आकाराने बारीक असलेला स्मार्ट फाेनचा प्राेसेसर लवकर गरम हाेताे. त्याचा परिणाम बॅटरीवरही हाेत असताे. याशिवाय इतर काही कारणांमुळेही तुमचा फाेन वारंवार गरम हाेऊ शकताे... 

 

स्मार्टफोन केस : 
स्मार्टफाेन केसमुळे (कव्हर) गरम हाेऊ शकताे. हे कव्हर पूर्णपणे प्लास्टिकचे असतात किंवा त्यात प्लास्टिकचे प्रमाण जास्त असते. लेदरपासून तयार झालेले कव्हरही आतील इन्शुलेशनमुळे गरम हाेऊ शकतात. बाहेरून हा फाेन थंड असला तरी आतून मात्र ताे गरम झालेला असताे. 


ओव्हरलोडिंग :

फोनमध्ये गरजेपेक्षा जास्त अॅप, गेम्स किंवा इतर साॅफ्टवेअर असतील तर अशी समस्या येऊ शकते. याशिवाय फाेनमध्ये अनेक अॅप्स बॅकराउंडला सुरू असतात. ते प्राेसेसर, रॅमसह डेटा पॅकचाही वापर करून घेत असतात. 

 

इंटरनल मेमरी : 
मेमरी फुल झाल्यानेही फाेन गरम हाेताे. त्यामुळे मेमरी रिकामी करावी किंवा कंपनीच्या सेवा केंद्राशी संपर्क साधावा. 

 

व्हायरस
यामुळे तुमच्या फाेनचे कामच थांबू शकते. चांगल्या अॅन्टिव्हायरसचा उपयाेग केल्यास फाेनची सुरक्षा कायम राहू शकते. 

 

कॅमेरा फोन्स : 
स्क्रीन ब्राइटनेस, सलेक्टेड रिझोल्युशन व फ्रेम रेटशिवाय बराच वेळ कॅमेरा वापरल्यासही फाेन गरम होण्याची शक्यता अधिक असते.
 
जीपीएस किंवा गुगल मॅप : 
राेज या अॅपचा माेठ्या प्रमाणावर वापर हाेत असल्यासही तुमचा फाेन गरम हाेऊ शकताे.
 
या टिप्सचा वापर ठरेल फायदेशीर 
उपयाेगात न येणारे अॅप्स काढून टाका : 
जे अॅप्स तुमच्या उपयाेगात येत नाहीत ते बंद करण्यासाठी अॅप आयकाॅनवर फाेर्स स्टाॅप सलेक्ट करा. हे अॅप राेजएेवजी कधी कधी वापरात आणा. 

 

अनेक साधे उपाय केल्यास समस्या हाेईल दूर : 
कव्हर काढून टाका, एअरप्लेन माेड ऑन करा व डिस्प्लेचा ब्राइटनेस कमी करा. बॅटरी सेव्हर माेड ऑन करा. वाय- फाय, ब्ल्यू टुथ व जीपीएसचा वापर कमी करावा.

 

बॅटरी ऑप्टिमायझेेशन : 
बॅटरी ऑप्टिमायझेशन फीचर असलेल्या अँड्रॉइड फाेनचा वापर करावा. खराब बॅटरी व केबल वापरू नका. जुन्या फाेनची बॅटरी १०० टक्के चार्ज करू नका. फाेन गरम झाल्यास इन्शुलेटेड कव्हर तातडीने काढून टाका. 

बातम्या आणखी आहेत...