आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एप्रिलमध्ये कमी बजेटमध्ये फिरण्यायोग्य आहेत हे 4 शानदार Destination, कमी खर्जात घेऊ शकता रोमांचक अनुभव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली - भारतात अनुकूल वातावरणांप्रमाणे फिरण्यासाठी विविध ठिकाणं आहेत. हिवाळ्यात सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी दक्षिण भारतात विविध पर्यटन स्थळे आहेत. तसेच उन्हाळ्यात आनंद घेण्यासाठी भारतातील डोंगर-दऱ्या आणि समुद्र किनारे आहेत. सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. अशात लोकांना सुट्टया व्यतित करण्यासाठी योग्य अशा ठिकाणांची गरज असते. आम्ही तुम्हाला भारतातील अशाच काही विशेष प्रेक्षणीय स्थळांविषयी सांगत आहोत. ज्या ठिकाणी तुम्ही एप्रिल महिन्यात फिरण्याचा प्लॅन तयार करू शकतात. तुम्ही जर दिल्लीहून या ठिकाणांवर फिरण्यासाठी गेलात तर तुम्ही फक्त 5 हजार रूपयांपेक्षा कमी बजेटमध्ये आपल्या उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकाल. 

 

पचमढी, मध्यप्रदेश
पचमढी हे मध्यप्रदेशातील एकमात्र हिल्स स्टेशन आहे सातपुडा पर्वत रांगेत स्थित असल्यामुळे याला सातपुड्याची राणी देखील म्हटल्या जाते. हे ठिकाण आपल्या हिरवेगार दाट जंगले, तलाव, आणि इतर अनेक गोष्टींसाठी ओळखले जाते. निर्सगप्रेमींसोबतच साहसी लोकांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. तुम्ही येथील निसर्ग सौंदर्यासोबत सातपुडा राष्ट्रीय उद्यानाची सैर करू शकतात. हे उद्यान वाघ, बिबट्या, चिंकारा, अस्वल, जंगली म्हैस, सांबर आणि हरणाच्या विविध प्रजातींसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. सोबतच इतरही प्राणी आणि पक्षी तुम्ही येथे पाहू शकता. याशिवाय तुम्हाला येथे प्राकृतिक गुहा बघायला मिळतील. 

 

कदमत द्वीप, लक्षद्वीप

लक्षद्वीप येथील कदमत द्वीप उन्हाळी सुट्टी घालविण्यासाठी एक आदर्श स्थान मानले जाते.  आपल्या प्राकृतिक सौंदर्यामुळे कदमत पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. हे ठिकाण पर्यटकांसाठी एखाद्या स्वर्गापेक्षा कमी नाही. लक्षद्वीपमधील हे द्वीप 3.12 वर्ग किमीच्या क्षेत्रात पसरले आहे. येथे तुम्ही समुद्राच्या सुंदरतेबरोबरच वॉटर अॅडव्हेंचरचा आनंद घेऊ शकता. तुम्ही एप्रिल महिन्यात याठिकाणी जाण्याचा प्लॅन करू शकतात. 

 

ऋषिकेश
ऋषिकेशच्या डोंगर दऱ्यात वाहणाऱ्या गंगेच्या लाटांनी मन आकर्षित होते, येथील हवा मनाला शांत करते, येथील वातावरणील पवित्रतेची गंगा स्वतःच साक्षीदार बनते. तसेच येथे अनेक प्रसिद्ध मंदिरे देखील आहेत. ऋषिकेश रिव्हर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही येथे आपल्या मित्रांसोबत रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवू शकता. 


भीमेश्वरी

भीमेश्वरी बंगळुरू जवळील एक छोटेसे पर्यटन स्थळ आहे. जे लोक जीवनाच्या धामधुकीतून काही काळ शांततेत घालवायचे आहेत त्यांच्यासाठी हे एकदम परिपूर्ण ठिकाण आहे. येथे बर्ड वाचिंग, फिशिंग आदींचा अनुभव घेऊ शकतात. 

बातम्या आणखी आहेत...