Home | Business | Gadget | best wireless earphones for rainy season

पावसात खराब नाही होणार शाओमीसह या 5 कंपन्यांचे वायरलेस ईअरफोन्स, इतक्या रुपयांपासून किंमत सुरू

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 15, 2019, 12:48 PM IST

IPX4 रेटिंग वॉटर आणि स्वेट रेसिस्टेंट डिव्हाइला देण्यात येते

 • गॅझेट डेस्क - तुम्ही जर नवीन ईअरफोन्स विकत घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला पावसाळ्यासाठी योग्य अशा 5 ईअरफोन्सबद्दल सांगत आहोत. यामुळे तुम्ही भर पावसात देखील गाणे ऐकण्याचा आनंद घेऊ शकता. सोबतच यांची किंमत देखील खिशाला परवडणारी आहे. हे ईअरफोन्स ऑनलाइन आणि ऑफलाइन सहज उपलब्ध आहेत.

  बोल्ट ऑडियो प्रो बेस स्पेस ब्लूटूथ ईअरफोन

  या ईअरफोन्सला IPX4 वॉटर आणि स्वेट रेसिस्टेंट रेटिंग देण्यात आली आहे. याचे वजन फक्त 14 ग्राम आहे. या ईअरफोनची बॅटरी फुल चार्ज केल्यानंतर 24 तास स्टँडबाय आणि 6-8 तास प्लेबॅक बॅकअप मिळतो. याची किंमत 1,199 रूपये आहे.

  बोट रॉकर्स 255 ब्लूटूथ ईअरफोन

  या ईअरफोनला IPX5 रेटिंग देण्यात आली आहे. यामुळे हे पावसात देखील वापरता येते. यामध्ये एक्स्ट्रा बेस देण्यात आला आहे. यामुळे म्युझिक क्वॉलिटी आणखीनच उत्तम होते. एकदा चार्ज केल्यानंतर 5-6 तास सहज वापरू शकता. याची किंमत 1,399 रूपये आहे.


  शाओमी स्पोर्ट्स ब्लूटूथ ईअरफोन
  शाओमीचे उत्पदनांना भारतात सगळ्यात पसंती मिळते. अशा म्युझिक लव्हर्ससाठई शाओमीचे हे वॉटरप्रूफ ईअरफोन एक उत्तम पर्याय होऊ शकतो. या ईअरफोनला IPX4 वॉटर आणि स्वेट रेसिस्टेंट रेटिंग देण्यात आली आहे. याचा म्युझिक प्लेबॅक वेळ 5-6 तासांचा आहे. याची किंमत 1,499 रूपये आहे.

  वनमोर iBfree स्पोर्ट ब्लूटूथ ईअरफोन
  तुमचे बजट 2 ते अडीच हजार रुपयांपर्यंत असेल तर हे ईअरफोन तुमच्यासाठी चांगला पर्याय होऊ शकतो. याचा प्रीमियम डिझाइनमुळे हे आणखीनच शोभून दिसतात. या ईअरफोनला IPX6 रेटिंग दिली आहे. तर याचा म्युझिक प्लेबॅक टाइम 6-8 तासांचा आहे. याची किंमत 2,698 रू आहे.

  Mivi कॉलर वायरलेस ब्लूटूथ ईअरफोन
  कॉलर वायरलेस ब्लूटूथ ईअरफोन पसंत करणाऱ्या लोकांना Mivi चे हे ईअरफोन चांगला पर्याय आहे. याला IPX4 रेटिंग दिली आहे. तर याचा म्युझिक प्लेबॅक टाइम 6-8 तासांचा आहे. याची किंमत 2,489 रूपये आहे.

Trending