आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 ते 15 मार्च काळात या 7 राशीचे लोक जॉब आणि बिझनेसमध्ये राहतील भाग्यशाली

2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक

9 ते 15 मार्च या काळात चंद्र सिंह राशीपासून वृश्चिक राशीपर्यंत जाईल. या आठवड्यात बुधाची चालही बदलेल. या आठवड्यात ग्रहांची विशेष स्थिती जुळून येत असल्यामुळे 7 राशींसाठी सप्ताह शुभ राहील. या आठवड्यात बृहस्पतीची दृष्टी चंद्रावर असल्यामुळे काही राशीच्या लोकांना गजकेसरी योगाचा फायदा होईल. यामुळे जॉब आणि बिझनेसमध्ये लाभ होण्याचे योग आहेत. नशिबाची साथ मिळेल. या काळात काही लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी आठवडा संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...

 • मेष

सर्वश्रेष्ठ कार्य करण्यास तुम्ही सक्षम आहात, पण तुम्हाला त्यातून मनासारखे फळ मिळणार नाही. अज्ञात गोष्टींसाठी मन उदास होऊ शकते. चंद्राची स्थिती धनाचा लाभ सुरूच ठेवेल. काही काळ घरापासून दूर राहावे लागण्याची शक्यता आहे. इतर व्यक्तींना समजून घेण्यात अडचण जाणवेल. व्यर्थ गोष्टींत अडकून पडण्याची शक्यता आहे.

 • वृषभ

चतुर्थ चंद्रामुळे धनाच्या कमतरतेसह आठवड्याची सुरुवात होईल, पण आठवड्याच्या मध्यापासून सुधारणा होऊ लागेल. मंगळवारपासून कर्जातूून मुक्तीचा उपाय आणि जमिनीपासून लाभ होण्याची शक्यता आहे. आई-वडिलांकडून प्रेम आणि सहकार्य मिळेल. तुम्ही कामात व्यग्र राहाल तसेच प्रवास होण्याचेही काही योग आहेत.

 • मिथुन

तुमच्यासाठी हा काळ अनुकूल आहे. अशक्य वाटणारी कामेही तुम्ही करून दाखवाल, अशी शक्यता आहे. मंगळ आणि गुरूची दृष्टी असल्यामुळे फारसा फरक पडणार नाही. नव्या फायदेशीर योजना मिळतील तसेच पैशांची आवक चांगली राहील. अपत्यांकडूनही फायदाच होणार आहे.

 • कर्क

शनीची दृष्टी कायम राहील. दुसरा चंद्र आर्थिक आधार मजबूत ठेवेल. तुमचा आत्मविश्वास कायम राहील, पण मनासारखे यश मिळेल की नाही याबाबत संशय आहे. कामाच्या ठिकाणी वर्चस्व मिळण्याच्या लढाईत काही आरोप होऊ शकतात. तत्काळ निर्णय घेणे टाळा तसेच विचार करून कामे करा.

 • सिंह

चंद्राच्या प्रवेशासह आठवड्याचा प्रारंभ होईल. तुमचे मन थोडे उदास राहू शकते, पण त्यामुळे आर्थिक बाबतीत तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. उद्दिष्टप्राप्तीही सहजपणे होईल. बुधवारनंतर तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळण्याचा योग तयार होईल. अडचणींचा शेवट होईल. त्यामुळे समाधान वाटेल.

 • कन्या

बारावा चंद्र सुरुवातीला नुकसान वाढवू शकतो. बुधवारपासून स्थिती पुन्हा सामान्य होऊ लागेल तसेच कामाला वेग येईल. तुम्हाला मित्रांचे चांगले सहकार्य मिळेल तसेच कामे वेळेवर पूर्ण करण्यास समर्थ राहाल. गुरुवारी आणि शुक्रवारी वादांपासून दूर राहावे, असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे.

 • तूळ

राशिस्वामी शुक्राची प्रबळ दृष्टी प्राप्त होत नाही, तरीही तुमच्या राशीला अडचणींशी झुंज देण्याची शक्ती मिळत आहे. तुमचे आत्मबळ वाढलेले राहील, आठवड्याच्या मध्याला त्याची जास्त गरज भासेल. आठवडाअखेरीस परिस्थिती पुन्हा सुरळीत होईल. तुमच्या अडचणीही संपून जातील.

 • वृश्चिक

चंद्राचे गोचर पूर्णपणे अनुकूल आहे. संपूर्ण आठवड्यात ते तुम्हाला कुठलीही अडचण येऊ देणार नाही. गुरुवारी आणि शुक्रवारी विशेष सतर्कता बाळगावी लागेल. उर्वरित काळात पैशांची आवक चांगली राहील तसेच सर्व बाजूंनी सहकार्य मिळेल. आठवड्याच्या अखेरीस एखादे मोठे काम होऊ शकते.

 • धनू

मंगळ, गुरू आणि केतूचे गाेचर अाहे. कामाचा विस्तार होईल तसेच तुमच्या जबाबदाऱ्यांत वाढ होईल. आयुष्य व्यवस्थित आणि सुरळीत सुरू राहील. भविष्याबाबत अनावश्यक चिंता जाणवू शकते. आठवड्याच्या अखेरीस पैशांसंबंधी अडचणी येण्याची शक्यता आहे. प्रवासाचे योगही आहेत.

 • मकर

राशिस्वामी शनीचे गोचर सुरू आहे, त्यामुळे सुख मिळणारी स्थिती तयार होईल. कामांत यश मिळेल तसेच त्याचे क्रेडिटही मिळेल. योजना यशस्वी होतील. तसेच उद्दिष्टप्राप्ती करण्यात यश मिळेल. उत्पन्नाच्या बाबतीत बुधवारनंतर वेग येईल. त्याआधी मंदी जाणवू शकते.

 • कुंभ

चंद्राच्या दृष्टीमुळे बुधवारपर्यंत एखादा मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो, पण थोडी उदासीनताही जाणवू शकते. कुटुंबात वर्चस्व कायम राहील. तसेच योजना यशस्वी होतील. जुन्या मित्रांशी भेट होऊ शकते. प्रवास जास्त होईल. शनिवारी कुटुंबासोबत राहण्याची संधी मिळेल.

 • मीन

राशीला मंगळ आणि चंद्राचे बळ मिळालेले आहे. हा काळ सांभाळून काम करण्याचा आणि वादांपासून दूर राहण्याचा आहे. अनेकदा विपरीत परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो, विशेषत: मंगळवारी व शुक्रवारी. जवळच्या लोकांचा विश्वास कायम ठेवा. धनप्राप्ती होईल.

बातम्या आणखी आहेत...