आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

275 रुपये किलोचा खवा मिळतो 160 ते 200 रुपये किलोने, जाणून घ्या या स्वस्ताईमागचा जीवघेणा खेळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वाल्हेर - दसरा, दिवाळी असे सण जवल येताच खव्याच्या नावाखाली भेसळ करणारे लोक सक्रिय होत असतात. बाजारात भिंड, मुरैना आणि ग्वाल्हेरच्या ग्रामीण भागांतून तो खवा शहरात पाठवला जातो, त्याच चिकटपणासाठी मोठ्या प्रमाणावर रिफाइंड ऑइलची भेसळ केली जात आहे. 


चिकटपणासाठी मिसळतात तेल 
आम्ही लोकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी खवा तपासण्याचा निर्णय घेतला. 160 पासून 220 रुपये किलोपर्यंत वेगवेगळ्या भावामध्ये तीन विक्रेत्यांकडून प्रत्येकी 250-250 ग्रॅम खवा खरेदी केली. सर्वांनी खव्याच्या शुद्धतेचा दावा केला. सर्वांनी खवा हातावर घासून तो चिटकत नसल्याचेही दाखवले. त्यावरून तो शुद्ध आहे असे सांगितले. त्यानंतर या खव्याची तपासणी केली. 3 तास खव्याच्या या सॅम्पलमध्ये स्टार्च, साखर, ब्युटरो रिफ्लेक्टो मीटर रीडिंग (बीआर), फॅट आणि आर्द्रता यांची तपासणी केली. दोन सॅम्पलमध्ये रिफाइंड ऑइलची भेसळ केल्याचे समोर आले तर तिसऱ्याच फॅट कमी दाखवले. 


ब्यूटरो रिफ्लेक्टो मीटर रीडिंग म्हणजे काय? 
याद्वारे खव्यातील भेसळ चेक केली जाते. शुद्धतेच्या मानकांनुसार आदर्श प्रमाण 40 ते 43 पॉइंट असते. पण आम्ही घेतलेल्या सॅम्पलमध्ये हे प्रमाण 48 पॉइंट आणि त्यापेक्षा जास्त होते. ते घातक समजले जाते. म्हणजेच यात रिफाइंड ऑइल मिक्स होते. 


जास्त नफ्यासाठी भेसळ 
1 लीटर दुधापासून 200 ग्रॅम खबा निघतो. तो 55 रुपयांचा असतो. म्हणजे एक किलो खवा 275 रुपयांचा होतो. शिवाय इंधन, लेबर खर्च वेगळा. ग्राहकांना 150 ते 200 रुपये किलोने खवा देणारे व्यापारी दुधातून क्रीम काढून घेत असतात. दुधामध्ये रिफाइंड ऑइल मिक्स करून खवा तयार करतात. 

 

बातम्या आणखी आहेत...