आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागॅजेट डेस्क- भारतात कधी काळी Sarahah अॅप खूप लोकप्रिय झाले होते, त्याच प्रकारे सध्या Face App लोकप्रिय होत आहे. या अॅपमधून लोक आपल्या फोटोला म्हाताऱ्यापणीचा लूक देऊ शकतात. पण तुम्हाला माहिती आहे का की, हे अॅप नवीन नाहीये. अनेक दिवसांपासून हे अॅप आहे पण सध्या ते खूप लोकप्रिय होत आहे.
FaceApp नुसार कंपनी आर्टिफिशिअल इंटेलिजंस टेक्नॉलजीचा वापर करून फोटोंना म्हाताऱ्यापणीचा लूक देते. हे अॅप 2017 मध्ये लॉन्च झाले होते. याला युज करण्यात रिस्क आहे? हे अॅप तुमच्या फोटो लायब्रेरीचे फूल अॅक्सेस घेते? अशाप्रकारचे अनेक प्रश्न लोकांच्या मनात सध्या येत आहेत.
या अॅपला फक्त सामान्य नागरिकच नाही, तर अनेक सेलिब्रिचीज वापरत असल्याने हे अॅप प्रचंड लोकप्रिय होत आहे. फोटोजला एडिट करण्यासाठी हे अॅप न्यूरल नेटवर्कचा वापर करते. न्यूरल नेटवर्क आर्टिफिशिअल इंटेलिजंसचाच एक प्रकार आहे. या अॅपमधून फक्त म्हातार लूकच नाही तर, यंग लूक, जेंडर चेंगसारखे प्रकार करता येतात.
काय आहे FaceApp ची प्रायवसी पॉलिसी?
जेव्हा तुम्ही आमची सर्विस युज करता, आमची सर्विस ऑटोमॅटिकली काही लॉग फाइल इनफॉर्मेशन रेकॉर्ड करते.यात तुमची वेब रिक्वेस्ट, आयपी अॅड्रेस, ब्राउजर टाइप, यूआरएल आणि या सर्विस सोबत तुम्ही कितीवेळेस इंटरॅक्ट करता. ही अशी माहिती यात सामील आहे.
पॉलिसीत हेदेखील सांगितले आहे की, कंपनी यूझर डेटा त्यांच्या परवानगीशिवाय विकणार नाही आणि रेंटवरही देणार नाही. पण फेस अॅपच्या ग्रुपच्या कंपन्याना तुमचा डेटा दिला जाऊ शकतो, कारण तुम्ही याला कॉन्सेंट दिले आहेत. कंपनीच्या पॉलिसीनुसार जर कंपनीला वाटले की, थर्ड पार्टी एडवार्टाइजिंग पार्टनर्सला काही माहिती दिली जाऊ शकते, तर ते देऊ शकतात. यात कूकीज डेटा सामिल आहे.
BE CAREFUL WITH FACEAPP - the face aging fad app. It immediately uploads your photos without asking, whether you chose one or not. https://t.co/LlqkDpy4ZO
— Joshua Nozzi 🇺🇸👨🏻💻 ⚣ (@JoshuaNozzi) July 16, 2019
Re: FaceApp, can’t speak to it “uploading” photos but the app is definitely able to access my library even though I have Photos permission set to “never” 🤔 pic.twitter.com/jDMkqu5nML
— Karissa Bell (@karissabe) July 16, 2019
If you use #FaceApp you are giving them a license to use your photos, your name, your username, and your likeness for any purpose including commercial purposes (like on a billboard or internet ad) -- see their Terms: https://t.co/e0sTgzowoN pic.twitter.com/XzYxRdXZ9q
— Elizabeth Potts Weinstein (@ElizabethPW) July 17, 2019
अॅप बॅकग्राउंडमध्ये तुमची फोटो लायब्रेरी क्लाउडवर अपलोड करत आहे?
हे अॅपला व्हायरल झाल्यानंतर ट्विटरवर काही लोकांनी फोटो अपलोड होत असल्याचे सांगितले. पण सिक्योरिटी रिसर्चर रॉबर्ट बॅपटीस्टने सांगितले की, असे नाहीये आणि याचा कोणताही पुरावा मिळाला नाहीये. पण हेदेखील खरे आहे की, जो फोटो तुम्ही वापरत आहात, त्याचा फूल अॅक्सेस तुम्ही कंपनीला देत आहात. सध्या या प्रायव्हसीच्या प्रश्नावर FaceApp कडून कोणतेही स्टेटमेंट आलेले नाहीये.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.