Health / हेल्थ अलर्ट : डासच नाही तर मान्सूनमध्ये या प्राण्यांपासूनही राहावे सावध

पावसाळ्यात हिरवळीच्या ठिकाणापासून सावध राहावे

दिव्य मराठी वेब

Aug 12,2019 05:32:35 PM IST

पावसाळ्यामध्ये फक्त जीवघेण्या डासांचा धोका नाही तर याव्यतिरिक्त अनेक असे जीव आहेत जे धोकादायक ठरतात. पावसाळ्यात अनेक जीव ओलाव्यामुळे आपल्या बिळांबाहेर येतात. यामुळे या ऋतूमध्ये डास तसेच इतर काही प्राण्यांपासुन सावध राहावे. ज्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया इ. आजारांपासून आपण दूर राहू. येथे जाणून घ्या, कोणकोणत्या जीव-जंतुंचा पावसाळ्यात धोका राहतो..


लाल मुंग्या - पावसाळ्यात घरामध्ये लाल मुंग्या दिसणे सामान्य आहे परंतु आकाराने लहान दिसणाऱ्या या मुंग्या चावल्यानंतर त्वचा सुजते, जळजळ होते आणि इतरही समस्या निर्माण होऊ शकतात.


साप - पावसाळ्यात बहुतांश साप बिळामधून बाहेर पडतात. ज्याठिकाणी हलके हिरवे गवत, हिरवळ असते तेथे साप जातात. यामुळे पावसाळ्यात हिरवळीच्या ठिकाणी जाताना विशेष लक्ष द्यावे. सापाने दंश केल्यास लगेच डॉक्टरांकडे जावे आणि साप चावलेल्या ठिकाणच्या दोन्ही बाजूला घट्ट पट्टी बांधावी.


विंचू - विंचवाच्या दंशाने व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. वेळेवर योग्य उपचार न केल्यास व्यक्ती दगावण्याची शक्यता वाढते. यामुळे या काळात विचंवापासून दूर राहावे.


माशा : पावसाळ्यात सर्वात जास्त त्रास माशाच देतात. या थेट नुकसान करत नाहीत परंतु यांच्यावर असंख्य किटाणू असतात. या ऋतूमध्ये खाद्यपदार्थांवर माशा बसणार नाहीत याकडे विशेष लक्ष द्यावे.

X
COMMENT