आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Beware Of WhatsApp Gold Version Message, It's A Scam

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Alert ! तुमच्याही WhatsApp वर येत आहे का मेसेज, व्हा सावधान, डेटा होऊ शकतो चोरी...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्हीही वॉट्सअॅपचा वापर करत असाल, तर सावधान व्हा. काही दिवसांपासून वॉट्सअॅपवर एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यात लोकांना वॉट्सअॅप अपग्रेड करण्याची लिंक पाठवण्यात येत आहे. या व्हर्जनला ‘Gold’ नाव दिले आहे. जर तुमच्याकडे असा कोणता मेसेज आला असेल किंवा भविष्यात आला, तर चुकूनही या लिंकवर जाऊन इंस्टॉल करू नका, हा एक स्कॅम आहे. या लिंकवर जाऊन तुम्ही काही इंस्टॉल केले तर तुमचा डेटा हॅकर्सच्या हाती लागु शकतो.
 

त्या मेसेजसोबत लिहीले आहे की, या नवीन व्हर्जनला तुम्ही डाउनलोड करून इंनस्टॉल केले तर तुम्ही एकाच वेळेस 100 लोकांना फोटो पाठवू शकता, त्यासोबतच तुम्ही पाठवलेले मेसेज कधिही डिलीट करू शकता. पण असे काहीच नाहीये, या लिंकमध्ये एक प्रकारचा व्हायरस आहे जो तुमच्या फोनमधील सगळा डेटा हॅक करतो. 


WhatsApp ने दिले स्पष्टीकरण
वॉट्सअॅपकडून सांगण्यात आले आहे की, त्यांच्याकडून कोणतेही गोल्ड व्हर्जन लॉन्च करण्यात आलेले नाहीये, हा हॅकर्सचा कट आहे, त्यामुळे तुम्ही अशा कोणत्याही प्रकारच्या लिंकवर जाऊन काही इंनस्टॉल करू नका. यामुळे तुमची खसगी माहिती चोरीला जाऊ शकते.


जर इन्सॉल केले असेल तर काय करावे?
जर तुम्ही तुमच्या फोनमध्ये या व्हायरस वाल्या लिंकवरून काही इनस्टॉल केलेले असेल तर लगेच तुमचा मोबाईल फॅक्टरी रीसेट करा. हा नवीन व्हर्जनचा फेक मेसेज 2016 पासून सर्क्यूलेट केला जात आहे.