आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान! गवतात हा प्राणी आढळला तर लगेच दूर व्हा, अन्यथा तुमचा जीवही जाऊ शकतो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गवतावर अनवाणी पायांनी चालणे चांगले असते असे म्हणतात. पण नुकतीच एक अशी घटना समोर आली आहे जी समजल्यावर तुम्ही पुन्हा गवतावर अनवाणी पायाने चालण्याची हिम्मत करू शकणार नाही. कारण अशी घटना तुमच्याबरोबर घडल्यास त्यामुळे तुमचा जीवही धोक्यात येऊ शकतो. फोटोत गवतामध्ये एक विचित्र जीव दिसत आहे. त्यामुळे एखाद्या वक्तीचा जीवही जाऊ शकतो. 


तुम्हाला एखाद्या मैदानाजवळ असा जीव दिसला तर लगेच त्याठिकाणाहून पळ काढा आणि कोणाला तरी बोलावून आणा. कारण याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. या खुणेच्या खाली एक असा विचित्र जीव आहे, ज्याच्या चावण्यामुळे काही वेळातच मानसाचा मृत्यू होऊ शकतो. 


याप्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यात हातात ग्लोव्हज परिधान केलेल्या एका व्यक्तीने हातात एक लहान प्राण्याला पकडलेले दिसत आहे. यात हा प्राणी नेमका कोणता आहे हे समजत नाही. पण व्हिडिओत हा अत्यंत विषारी प्राणी असून मानवासाठी किंवा इतर प्राण्यासाठी धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. तर काही लोकांनी व्हिडिओवर प्रतिक्रिया देत हा प्राणी म्हणजे लहान ससा असल्याचे म्हटले आहे. हा व्हि़डिओ नेमका कुठला आहे हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

बातम्या आणखी आहेत...