आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावजयीचे जडले दिरावर प्रेम, 8 वर्षे भेटले लपूनछपून, पण आगीसारखी पसरली अवैध संबंधांची माहिती, मग एकमेकांच्या मिठीतच सोडले प्राण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगरूर, पंजाब - प्रेम आंधळे असते असे म्हणतात, परंतु उर्वरित जग मात्र ते उघड्या डोळ्यांनी पाहत असते. असेच काहीसे एका प्रेमीयुगुलासोबत घडले. 30 वर्षीय बेअंत कौरचे तिचा 35 वर्षीय दीर तरसेम सिंह ऊर्फ सेमावर प्रेम जडले. 8 वर्षे हे सर्व सुरू होते. ते नेहमी लपूनछपून भेटायचे. परंतु एका दिवशी त्यांना पकडण्यात आले. मग काय दोघांवर बंधने घालण्यात आली, तंबी देण्यात आली. परंतु या अवैध संबंधांचे सत्र काही थांबले नाही. यानंतर जेव्हा लोकांमध्ये कुजबुज सुरू होऊन खिल्ली उडवण्यात येऊ लागली तेव्हा दीर-भावजयीने विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली. कोटडा गावात एका निर्मनुष्य जागेवर दीर भावजयचा मृतदेह आढळला.

 

-शुक्रवारी शेताच्या मधोमध एका निर्मनुष्य जागेवरील एका पडक्या घरात दीर-भावजयी भेटायला पोहोचले. दोघेही औषधे आणण्याचा बहाणा करून घराबाहेर पडले होते. मग त्यांनी एकत्रच विष प्राशन केले. पोलिसांच्या मते, कुटुंबीयांना दोघांच्याही प्रेमसंबंधांची माहिती होती. परंतु लोकांच्या सततच्या टोमण्यांमुळे त्यांनी हे पाऊल उचलले. मृत महिलेच्या पतीच्या जबाबावरून पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...