आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सही पकडे है.. \'भाभीजी\' काँग्रेस मे है.. \'अंगुरी भाभी\' फेम अभिनेत्री शिल्पा शिंदे काँग्रेसमध्ये दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - "भाभीजी घर पर है' या मालिकेत अंगुरी भाभीचे पात्र साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिंदेने मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम आणि नेते चरणसिंग सप्रा यांच्या उपस्थितीत शिल्पाने काँग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाची शपथ घेतली. यापूर्वी ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाणार असल्याच्या चर्चेवरून प्रसिद्धीत आली होती. दरम्यान, मागाील वर्षभरापासून ती मालिकांपासून दूर होती. काही वेब सिरीजमध्ये ती सध्या काम करत आहे. ४१ वर्षीय शिल्पा तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. नुकतेच तिने इन्स्टाग्राम तसेच ट्विटरील तिचे खाते बंद करून टाकले होते. यामागील कारण स्पष्ट नसले तरी ती यामुळे चर्चेत होती. बिग बॉस-११ ची ती विजेतीही आहे. 

 

>> 1999 पासून दूरदर्शन वाहिनीवरुन शिल्पाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती अनेक टीव्ही सिरियल्समध्ये दिसली. 'भाभीजी घर पर है' या सीरियलमधून तिला विशेष ओळख मिळाली. मात्र नंतर काही कारणांमुळे तिने ही मालिका सोडली. पण नंतर बिग बॉसमुळे ती घराघरात पोहोचली आणि पुन्हा प्रसिद्धीच्या शिखरावर गेली 

>> शिल्पाने हातिम, चिडियाघर, देवो के देव महादेव, लापतागंज अशा सीरियल्समध्ये काम केलेय. तिने एका चित्रपटात काम केले होते. परंतू तो रिलीज झाला नाही.

>> शिल्पाला अभिनयासोबतच पेंटींग आणि डान्सिंगची आवड आहे. तिने तिच्या घरातील कोपरे स्वतःच्या हाताने सजवले आहेत. ती तणावातून बाहेर येण्यासाठी आणि मनाच्या समाधानासाठी चित्रकलेची मदत घेते. तिने इंटेरिअर डेकोरेशनचा कोर्सही पुर्ण केलाय.
>> शिल्पाचे वडिल हाय कोर्टमध्ये जज होते. 2013 मध्ये त्यांचे निधन झाले होते. तर आई गीता शिंदे हाउसवाइफ आहे.आई वडिलांना नेहमी वाटायचे की, शिल्पाने लॉ ड्रिग्री करावी. परंतू शिल्पाला अभ्यासाची आवड नव्हती. शिल्पा अॅक्ट्रेस बनण्याच्या स्वप्नांमध्ये इतकी बिझी होती कि तिने ग्रॅज्यूएशनसुध्दा कंप्लिट केले नाही.

बातम्या आणखी आहेत...