आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'भाभीजी घर पर हैं'च्या अनिता भाभीने प्रेग्नेंसीमध्ये केले फोटोशूट, फ्लॉन्ट केला बेबी बंप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. 'भाभीजी घर पर हैं'ची अनिता भाभी म्हणजेच सौम्या टंडन(34) आई होणार आहे. प्रेग्नेंसी पीरियड एन्जॉय करत असलेल्या सौम्याने नुकतेच बेबी बंपसोबतचे फोटोशूट केले. या फोटोंची एक झलक तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. फोटोशूटमध्ये सौम्याने मरुन कलरचा शॉर्ट ड्रेस घालून बेबी बंप फ्लॉन्ट केला आहे. सौम्याने सांगितले की, ही तिच्यासाठी सर्वात सुंदर फिलिंग आहे. सौम्या नेहमी लो प्रोफाइल राहणे पसंत करते. डिसेंबर 2016 मध्ये तिने बँकर बॉयफ्रेंड सौरभ देवेंद्र सिंहसोबत गुपचूप लग्न केले होते. लग्नाच्या 10 वर्षांपुर्वीपासून ते एकमेकांना डेट करत होते. प्रेग्नेंसीचे वृत्त समोर आल्यानंतर सौम्याने आमच्या वेबसाइटशी बातचित केली. बोलताना सौम्याने सांगितले की, आई बनल्यानंतरही ती काम सोडणार नाही. आपल्या बाळाला प्रेरणा मिळावी असे काही तरी काम ती करत राहणार आहे. ती म्हणाली की, हे बाळ तिच्यासाठी ताकद बनेल. 


सौम्यासोबतच्या बातचितचे काही अंश 
प्रेग्नेंसीचा अनुभव आयुष्यातील यूनिक अनुभव आहे. महिलेची प्रेग्नेंसी यूनिक असते आणि सर्वांचा प्रवास वेगळा असतो. सुरुवातीचे काही महिने टफ असतात, हे माझ्यासाठीही होते, आता मी सुंदर फेजमध्ये आहे. रोलर कोस्टर राइड एन्जॉय करत आहे. महिलांच्या बॉडीमध्ये होणा-या या जादूमुळे चकित आहे. मला सशक्त फिल होतेय, कारण माझी बॉडी एक आयुष्य क्रिएट करु शकते. 


चाहत्यांसोबत थेट संवाद साधायचा होता 
शुभचिंतक आणि दर्शकांसोबत कनेक्ट राहण्याची सर्वात सोपी पध्दत म्हणजे सोशल मीडिया आहे. कारण यामध्ये थेट संवाद साधता येतो. माफ करा, पण मीडिया कधी-कधी अंदाज लावते, कधी-कधी मिसकोट करते आणि अफवांना प्रोत्साहन देते. असेच माझ्या बाबतीत झाले. ही गोष्ट माझ्यासाठी खुप वयक्तिक आणि खास होती, मला हे या सर्व गोष्टींपासून दूर ठेवायचे होते. यामुळे मला वाटले की, सोशल मीडियावर पोस्ट करुन थेट चाहत्यांना सांगणे योग्य आहे. 

 

एक्सायटेड आहे यासोबतच नर्वसही आहे 
या रोलर कोस्टर प्रवासाविषयी खुप एक्सायटेड आहे. यासोबतच थोडी नर्वस आहे. प्रत्येक दिवस नवीन फिलिंग्स घेऊन येतो. मला माहिती आहे की, यानंतर मी ज्या गोष्टींसाठी पॅसिनेट आहे, त्यासाठी जास्त स्ट्राँग आणि फोकस होईल. या सर्व मिश्रित फिलिंग्स आहेत.

 

माझ्या बाळाला माझ्यावर अभिमान असावा आणि तो माझ्यामुळे प्रेरित व्हावा
वर्क प्लानविषयी लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. पण मला आयुष्यातील या फेजवर फोकस करायचे आहे. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत अॅक्टिंग करत राहणारच आहे. आई झाल्यानंतर आपले स्वप्न विसरावे अशा विचारातील मी नाही. माझे बाळ माझी स्ट्रेंथ असेल. त्याला माझ्यावर अभिमान असेल. तो मोठा होईल तेव्हा माझ्याकडून प्रेरित होऊ शकेल. मी बाळाला सांभाळून काम कसे मॅनेज करेल, यावर मी सध्या काही बोलू शकत नाही. पण आश्वासन देते की, आयुष्यात चांगले करेल. मी दृढ संकल्पित मुलगी आहे. काही प्रश्न हे योग्य वेळेसाठी सोडून द्यायला हवेत. आता सध्याचा काळ हा आनंद व्यक्त करण्याचा आहे.

बातम्या आणखी आहेत...