आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'भागो मोहन प्यारे'मध्ये मोहनसोबत लग्न थाटणारी मधुवंती खासगी आयुष्यातही आहे विवाहित, जाणून घ्या तिच्याविषयी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः 'भागो मोहन प्यारे' या मालिकेत आता मोहन आणि मधूवंती यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. मधुवंतीने मोहनकडे लग्नासाठी हट्ट धरला आणि आता मोहनकडे तिच्याशी लग्न करण्याला होकार देण्यावाचुन पर्याय उरला नाही. एका भूताचं माणसाशी लग्न होत असल्याने हा लग्नसोहळा जगावेगळा ठरणार हे नक्की...  या लग्नाला हडळ, मुंज्या, खविससह अख्खी भूतावळ जमणार आहे. येत्या 6 ते 9 नोव्हेंबर याकाळात हा जगावेगळा लग्नसोहळा प्रेक्षकांना बघता येणार आहे. या मालिकेत मोहनची भूमिका अभिनेता अतुल परचुरेंनी तर हडळ असलेल्या मधुवंतीची भूमिका अभिनेत्री सरिता मेहंदळे जोशी हिने साकारली आहे. मालिकेत मोहनच्या मागे लग्नाचा तगादा लावणारी मधुवंती अर्थातच सरिता खासगी आयुष्यातही विवाहित आहे. जाणून घेऊयात तिच्याविषयी.. 
 

#homeminister #goodfun #enjoyedalot😘

A post shared by Sarita Mehendale-Joshi (@sarita_mehendale_joshi) on

Happily Married with my Luv !! ❤️😘

A post shared by Saurabh Joshi (@saurabhjoca) on

मुळची सांगलीची आहे सरिता... 
सरिता मेहेंदळे मूळची सांगलीची परंतु अभिनयाची आवड असल्याने मुंबईत दाखल झाली. तिने रंगभूमीवर काम केलं आहे. अर्धसत्य, ए चल असं नसतं रे या नाटकात तिने महत्वाच्या भूमिका बजावल्या. झी मराठीवरील असे हे कन्यादान आणि कलर्स वाहिनीवरील सरस्वती मालिकेतही ती झळकली. भागो मोहन प्यारे मालिकेतून पहिल्यांदाच तिला प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. मालिकेतील एक ‘देखणी हडळ’ म्हणूनही तिला सेटवर बोलले जाते. 

♥️♥️

A post shared by Saurabh Joshi (@saurabhjoca) on

❤️💜🧡

A post shared by Saurabh Joshi (@saurabhjoca) on