आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भय्यू महाराजांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे सेवेकरी विनायक, शरद व तरुणीस अटक 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर- भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात अखेर पोलिसांनी तपास पूर्ण केला असून एका संशयित तरुणीसह तिघांना अटक केली आहे. त्यांच्यावर कट करून धमकावणे, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित तरुणी, विनायक दुधाळे व शरद पंडित अशी त्यांची नावे असून त्यांनीच कट करून भय्यू महाराजांना आत्महत्येस प्रवृत्त केले होते. तिन्ही आरोपींनी महाराजांना जाळ्यात ओढले होतेे. शुक्रवारी फूटी काेठी भागात राहणाऱ्या संशयित तरुणीस सीएसपी आझादनगरचा पदभार सांभाळत असलेल्या पल्लवी शुक्ला यांनी ठाण्यात बोलावून अटक केली, तर सेवेकरी विनायक दुधाळे व शरद पंडित यांनाही अटक करून दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिन्ही आरोपींना तुरुंगात ठेवण्याचे आदेश दिले. 

 

संशयित तरुणी, विनायक व शरद महाराजावर दबाव वाढवत होते :

एएसपी प्रशांत चौबे यांनी सांगितले, ज्या संशयित तरुणीस अटक केली आहे तिची भेट मनमीत अरोरा यांनी घालून दिली होती. यानंतर सेवेकरी विनायक व शरद पंडित यांनी तरुणीस आपल्या टोळीत सहभागी करून घेतले. तिला महाराजांच्या निकटवर्तीयांत नेऊन जाळ्यात ओढले. सुरुवातीला महाराज तिला मुलीसारखे वागवत असत. नंतर तरुणी महाराजांची खूप खास' जवळची झाली. ती सेवेकऱ्यांच्या माध्यमातून त्यांना ब्लॅकमेल करू लागली. महाराजांचे दुसरे लग्न थांबवण्यासाठी लग्नाच्या दिवशी सिल्व्हर स्प्रिंग येथील घरात जाऊन तिने गोंधळ घातला. या वेळी सेवेकरी विनायक व शरद तिच्यासोबत होते. एएसपी प्रशांत चोबे यांनी सांगितले, तरुणीने भय्यू महाराजांना दुसऱ्या लग्नानंतर एक वर्षाची मुदत दिली. त्यानंतर त्यांच्या लग्नासाठी १६ जून तारीख ठरवली. तिच्या मोबाइलवरून विनायक व शरद यांना पाठवलेल्या संदेशात स्पष्टपणे लिहिले होते की, आपला प्लॅन यशस्वी होणार की नाही? याच संदेशाबरोबर तिने अनेक अश्लील संदेश महाराजांना पाठवले होते, तर मुख्य सेवेकरी विनायकवर महाराजांची देखरेख करण्याच्या बहाण्याने तो त्यांना अनेक प्रकारचे सायकोट्रॉपिक ड्रग्ज देत होता. वेष्टन मात्र लपवून ठेवत होता. डॉक्टर जो औषधांचा डोस देत असत, त्याहून जास्त हेवी डोसचे औषध तो महाराजांना पाजत होता. महाराजांनी लग्न न केल्यास दाती महाराजांप्रमाणे त्यांनाही केसमध्ये अडकवण्याची धमकी त्या तरुणीने विनायक व शरदच्या साथीने दिली होती. अशा अनेक बाबी परिवार व सेवेकऱ्यांच्या जबाबातून पोलिसांनी नोेंदवूून घेतलेल्या आहेत. या रॅकेटचा पर्दाफाश सेवेकरी मनमीत अरोराच्या जबाबानंतर झाला. पाेलिसांनी जप्त केलेल्या महाराजांच्या मोबाइलमध्ये संशयित तरुणीने त्यांना पाठवलेले अश्लील चॅटिंग होते. 

 

चालक पाटीलच्या अटकेनंतर झाला महत्त्वाचा खुलासा 
एएसपी प्रशांत चोबे यांनी सांगितले, भय्यू महाराज आत्महत्या केसमध्ये डिसेंबर महिन्यात महाराजांशी संबंधित अॅड. निवेश उर्फ राजा बडजात्याला ५ कोटी रुपयांसाठी धमकी मिळाली होती. या प्रकरणात एमआयजी पोलिसांनी महाराजांचा वाहनचालक कैलास पाटील व त्याच्या दोन साथीदारांना अटक केली. कैलास पाटील यास अटक झाल्यानंतर आत्महत्या प्रकरणास नवे वळण मिळाले. त्यानंतर महाराजांना सेवेकरी व संशयित तरुणीकडून धमक्या मिळत असल्याची बाब उघड झाली होती. याच तणावात महाराजांनी आत्महत्या केली. पुन्हा गुन्ह्याचा तपास सुरू झाला. त्यानंतर सीएसपी आझादनगरच्या टीमने सर्व बाजूंनी तपास व पडताळणी केली. महाराजांशी संबंधित सर्व लोकांचे जबाब घेतले. तेव्हा खास सेवेकरी विनायक दुधाळे व शरद पंडित आणि संशयित तरुणीच त्यांना ब्लॅकमेल करत होती, ही बाब उघड झाली. 
 

 

बातम्या आणखी आहेत...