आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनायकचा जामीन फेटाळला, न्यायालय म्हणाले- दाती महाराजासारखी गत करण्याची धमकी भय्यूजींना देत असत आरोपी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर- भय्यू महाराजांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून तुरुंगात असलेला सेवेकरी विनायक दुधाळे यास जिल्हा न्यायालयाने जामीन देण्यास स्पष्ट नकार दिला. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळताना म्हटले, भय्यू महाराज यांना दाती महाराजांसारखी तुमची अवस्था करू, अशी धमकी विनायकसह तिन्ही आरोपी करत असत.

 

महाराजांकडून खूप मोठी रक्कमही हे आरोपी उकळत होते. भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात विनायक दुधाळे, पलक पुराणिक, व शरद देशमुख तुरुंगात आहेत. आपणास खोट्या प्रकरणात गुंतवले आहे, यासाठी जामीन देण्यात यावा, असा अर्ज त्याने न्यायालयात दाखल केला होता. महाराजांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये त्याच्यावर (विनायकवर) विश्वास दर्शवला होता. आत्महत्येनंतर बराच कालावधी उलटून गेल्यावर माझे नाव गोवण्यात आले, असे त्याने जामीन अर्जात म्हटले होते. 

 

घटना अत्यंत गंभीर, जामीन देण्यात येऊ नये 
शुक्रवारी अप्पर सत्र न्यायाधीश एम. के. शर्मा यांच्या समोर झालेल्या सुनावणीत सरकारच्या वतीने अभिजितसिंह राठौर यांनी जामीन अर्जास विरोध केला. ते म्हणाले, भय्यू महाराजांना आत्महत्या करण्यास भाग पाडणे ही घटना अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे आरोपीला जामीन मंजूर करण्यात येऊ नये. न्यायालयाने दोघांची बाजू ऐकून घेतल्यानंतर सरकारी पक्षाशी सहमती दर्शवली. न्यायालयाने म्हटले, भय्यू महाराजांच्या मृत्यूनंतर मर्गच्या संशोधनादरम्यान जबाब घेतले गेले आहेत. जबाब देणाऱ्यात आयुषी देशमुख, राजा बडजात्या, कैलाश पाटील व इतरांचा समावेश आहे. या जबाबात म्हटले, आरोपी विनायक, पलक व शरद देशमुख महाराजांकडे मनमानी रक्कम उकळत होते. पलक लग्नासाठी दबाव टाकत होती. त्यामुळे आरोपीला जामीन देता येत नाही. 
 

बातम्या आणखी आहेत...