आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीव्ही डेस्क - भजन गायक आणि बिग बॉस-12 चे माजी स्पर्धक अनूप जलोटा यांची आई कमला जलोटा यांचे मुंबईत निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. कमला जलोटा यांना चालणे-फिरणे आणि खाण्या-पिण्याबाबत अडचण येत होती. यामुळे त्यांना मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 19 जुलै रोजी सकाळी 5.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
21 जुलै रोजी होणार अंत्यसंस्कार
अनूप जलोटा यांचे प्रवक्ता प्रीतम शर्मा यांनी याची पुष्टी केली आहे. प्रीतम दैनिक भास्करशी बोलताना सांगितले की, 'अनूप यांच्या आईचे निधन झाले आहे. त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. दोन दिवसानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अनूप यांचा एक भाऊ अमेरिकत राहतो आणि बहिण लंडनला असते. दोघांनाही मुंबईत येण्यास वेळ लागेल यामुळे रविवारी 21 जुलै रोजी त्यांच्या अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.'
नृत्यात पारंगत होत्या अनूपच्या आई
कमला जलोटा यांना डान्सची आवड होती. लग्नापूर्वी त्यांनी अनेक शास्त्रीय नृत्यस्पर्धेत भाग घेतला होता. पण लग्नानंतर त्या संसारात अडकल्या. अनूप यांचे वडील पुरुषोत्तम दास जलोटा यांचे 2004 मध्ये न्यूयॉर्क येथे निधन झाले होते. यकृत निकामी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.