आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावातील भजी महोत्सवात गिरीश महाजन आणि सुरेश जैन यांनी कापला अभेद्य युतीचा केक, राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांना भरवले भजे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- येथील मेहरूण तलावा काठी पावसात आयोजित केलेल्या भजी महोत्सवात महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री सुरेश जैन यांनी जळगावात अभेद्य युतीचा केक कापला. यावेळी दोघांनी एकमेकांना युतीची भजी देखील भरवली. यावेळी राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैनही उपस्थित होते.


सध्या सर्वत्र पावसाचे वातावरण आहे आणि याच पावसात भजी खाण्याचे अनेकांचे मनं होते. अशातच राजकीय नेत्यांनाही भजी खाण्याचा मोह आवरत नाही. जळगावमध्ये भजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. येथील मेहरुण तलावाजवळ आयोजित केलेल्या भजी महोत्सवात महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री सुरेश जैन यांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी महाजन आणि जैन यांनी अभेद्य युतीचा केप कापला आणि एकमेंकांना भरवला. तसेच त्यांनी एकमेकांना गरमा-गरम भजीही भरवले.


या मोहत्सवात राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन आणि आणदार सुरेश भोळेही उपस्थि होते. गिरीश महाजनांनी त्यांनाही भजे भरवले. या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. इतर पक्षातील नेत्यांना आणि त्यांच्या मुलांना पळवून नेणारे नेते अशी ओळख गिरीश महाजनांची असल्यामुळे या भेटीमागे पळवापळवी तर नाही ना अशा शंका उपस्थित होत आहेत. दरम्यान, ईश्वरलाल जैन यांचे आपण मानसपुत्र असल्याने त्यांना पळविण्याचा विषयच नसल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. यावेळी युती होणारच असा विश्वास गिरीश महाजन आणि सुरेश जैन यांनी केला, तसेच जळगावपुरती युती पक्कीच असल्याते ते म्हणाले. या महोत्सवात माजी मंत्री एकनाथ खडसेंनी मात्र हजेरी लावली नाही.

बातम्या आणखी आहेत...