आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bhajji Paji's Entry In Bollywood, Poster Of Harbhajan Singh's Upcoming Movie 'Friendship' Released

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भज्जी पाजींची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरभजन सिंगचा आगामी चित्रपट 'फ्रेन्डशिप'चे पोस्टर रिलीज

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एक अतुलनीय खेळाडू बॉलिवूडमध्ये आपले नशीब अजमावणार आहे. एका न्यूज वेबसाइटनुसार, माजी भारतीय क्रिकेटर हरभजन सिंग आता अभिनयात पदार्पण करणार आहे. क्रिकेटमध्ये अतुल्य कामगिरी केल्यानंतर हभजन सिंग आता 'फ्रेंडशिप' नावाच्या चित्रपटाततून बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. या चित्रपटात भज्जी पाजी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासंदर्भातच चित्रपटाचे एक पोस्टरदेखील रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये दोन हात बेडीमध्ये बांधलेले दिसत आहेत आणि त्याखाली 'फ्रेंडशिप' असे टायटल देण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जॉन पॉल राज आणि शाम सूर्या यांनी केले आहे. या चित्रपटातील इतर कलाकारांबद्दल अद्याप उलगडा करण्यात आलेला नाहीये. हा चित्रपट याचवर्षी २०२० मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.